जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार राहुल ढिकले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या वेदिका होळकर या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी नाशिकचे प्रसिध्द उद्योजक विनोद ब्रम्हेचा, के.टी.एच.एम.कॉलेजचे प्राध्यापक डॉ.भास्कर ढोके, ग्रामपंचायत सदस्या श्वेता सचिन मालपाणी, माजी.पं.स.सदस्य गोकुळ पाटील, आ.राहुल ढिकले यांचे स्वीय सहाय्यक मनोज कोकरे, सामाजिक कार्यकर्ते किरण बरडिया, सोनाली ब्रम्हेचा, आदि मान्यवर उपस्थित होते.

तसेच याप्रसंगी खा.नरेंद्र जाधव यांच्या निधीतून दिलेले सॅनिटरी नॅपकीन व्हेडिंग मशीनचे उदघाटन श्वेता सचिन मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आ. राहुल ढिकले यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कलागुणही जोपासावेत. दांडगी इच्छाशक्ती असेल तर जीवनात काहीही अशक्य नाही असे विद्यार्थ्यांना सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा वेदिका होळकर यांनी जैन प्राथमिक शाळा हि विज्ञान युगातही मुलांवर संस्कार घडविणारी शाळा आहे. विविध शालेय उपक्रम राबविण्यात शाळेचा नावलौकिक आहे असे प्रतिपादन केले. शाळेचे माजी विद्यार्थी प्रा.भास्कर ढोके यांनी शाळेतील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. व संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. श्वेता मालपाणी, जव्हेरीलाल ब्रम्हेचा, सुनील आब्बड यांनी विद्यार्थ्यांना स्नेहसंमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे भन्नाट व अफलातून अशा विविध गीतांवर, विजेच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटात विविध नृत्ये सादर केली. यात वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, नाटीका, मुकाभिनय, एकांकिका या कार्यक्रमांचा समावेश होता.

या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचीव शांतीलाल जैन, श्री महावीर विद्यालयाचे अध्यक्ष सुनील आब्बड, जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा, आय टी आय चे अध्यक्ष मोहन बरडीया, संस्थचे विश्वस्त अजय ब्रम्हेचा, अमित जैन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष ब्रम्हेचा, सदस्य राहुल बरडीया, दर्शन साबद्रा, अजित आब्बड व श्री महावीर विद्यालयाचे प्राचार्य दिलीप डुंगरवाल, पर्यवेक्षक मधुकर बोडके, जैन प्राथमिक शिक्षण मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती नलिनी शिंदे, आय.टी.आय चे प्राचार्य साहेबराव हांडगे, वसतिगृह अधीक्षक धनपाल कोल्हापुरे, विभागप्रमुख गणेश महाले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापिका नलिनी शिंदे यांनी केले. या स्नेहसंमेलनाचे परीक्षण सुवर्णा क्षिरसागर, अजहर पठाण यांनी केले. तर सूत्रसंचालन उपशिक्षक राजेंद्र बनसोडे, महेश खैरनार व उपशिक्षिका लीनिता अहिरे, त्रिवेणी जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन जैन प्राथमिक शिक्षण मंदिरचे अध्यक्ष महावीर चोपडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व शाखांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

फेसबुक पेज लाईक करा –