निनावी पत्राने फोडली लैगिंक अत्याचाराला वाचा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन 

सांगलीच्या कुरळपमधील एका आश्रमशाळेतील सात मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. निनावी पत्राची दखल घेत पोलिसांनी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाला अटक केली आहे. अरविंद पवार असे या संस्थाचालकाचे नाव असून त्याच्यावर ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16f54834-c217-11e8-8ec7-67f65557b3ee’]
आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षांपासून लैंगिक शोषण सुरू होते असा आरोप पीडित मुलींनी केला आहे. आश्रमशाळेतील मुलींच्या निनावी पत्राद्वारे  संस्थाचालकाच्या अत्याचाराला वाचा फुटली आहे. दोन दिवसांपूर्वी कुरळप पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना एक निनावी पत्र आले होते. यामध्ये सर्व घटना मुलींनी सविस्तर लिहिली होती.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d494ee8-c217-11e8-94ec-af4425ebb3e0′]
पत्राद्वारे पीडित मुलींनी संस्थाचालक अरविंद पवारकडून होत असलेल्या अत्याचारातून आमची सुटका करा, अशी विनंती केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी वरिष्ठांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आश्रमशाळेत जाऊन मुलींना विश्वासात घेऊन घडलेला प्रकार जाणून घेतला.

आश्रमशाळेतील मुलींच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन संस्थाचालकाने त्यांना आपल्या वासनेचे शिकार बनवल्याचे म्हटलं जात आहे. याप्रकरणी नराधम संस्थाचालक अरविंद पवारला मदत करणाऱ्या महिला शिपायालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.