मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंत्रालयात बॉम्ब Bomb ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील हॉटलाईनवर रविवारी (दि. 30) दुपारी हा फोन आला. फोनवरून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 3378 जागांसाठी भरती; जाणून घ्या

सध्या मंत्रालयात पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच बॉम्ब Bomb शोधक व नाशक पथक दाखल झाले आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधारणतः तासाभरापूर्वी एक निनावी फोन आला होता. त्या फोनवर मंत्रालयात बॉम्ब Bomb ठेवल्याचे सांगण्यात आले आहे. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. दरम्यान रविवारची सुट्टी असल्याने कर्मचारी मंत्रालयात उपस्थित नव्हते. सध्या बॉम्बशोधक पथक मंत्रालय परिसराचा कसून तपास करत आहे. श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली आहे. असे असले तरी नेमकं कोणी फोन केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

Also Read This : 

जुन्नरच्या माजी आमदार लतानानी तांबे यांचे 85 व्या वर्षी पुण्यात निधन

लठ्ठपणा टाळण्यासाठी आहारात समावेश करा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या

EDLI Benefits : PF खातेधारकाच्या अकाली मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळते 7 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या ‘क्लेम’बाबत

पाणी असणार्‍या ‘या’ 5 फळांचं नक्की सेवन करा, डिहायड्रेशनपासून वाचेल शरीर; जाणून घ्या

Solapur : दुर्दैवी ! भीमा नदीत बुडून 4 मुलांचा अंत