पुण्यात स्वाईन फ्लुचे आणखी २१ बळी

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन

शहरात स्वाईन फ्लूने मृत्यू होण्याच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सध्याची आकडेवारी पाहता एकून मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. एकून मृतांपैकी २५ जण राज्याच्या विविध भागातील असल्याची माहिती महापालिकेतील आरेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cf00ca60-cb14-11e8-b72e-b7325273d3c5′]

जुलै महिन्यापासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते. त्यामध्ये आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात स्वाईन फ्लु बाधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १० आॅगस्टपर्यंत एकुण १० जणांचा आणि २२ सप्टेंबरपर्यंत एकुण २० जणांचा स्वाईन फ्लुने मृत्यू झाला होता. दि. ८ आॅक्टोबरच्या अहवालानुसार आणखी २१ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अहवाल १ सप्टेंबरपासूनचा असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या स्वाईन फ्लु आढावा समिती बैठकीत २१ जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे स्वाईन फ्लुने मृत्यू झालेल्यांचा आकडा ४१ वर गेला आहे.

[amazon_link asins=’B071RC6NHM,B00E8TXCFO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f3b59bfa-cb14-11e8-97b8-3b2303b9b9d7′]

शहरात दररोज स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळून येत आहेत. १ जानेवारीपासून स्वाईन फ्लुने बाधीत झालेल्यांची २९९ वर पोहोचली आहे. १३२ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी ३८ जण व्हेंटिलेटरवर आहेत. दि. ८ आॅक्टोबरला एकुण ५ हजार ४६४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ जणांना स्वाईन फ्लु झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर २११ जणांना टॅमी फ्लु गोळ्या देण्यात आल्या आहेत. दरम्यान, एकुण मृतांपैकी १६ जण पुणे शहरातील रहिवासी असून उर्वरीत २५ जण राज्याच्या विविध भागातून पुण्यात उपचारासाठी आले होते. त्यामुळे केवळ शहरातील मृतांचा आकडा १६ वर गेला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

स्वाईन फ्लुच्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्ड किंवा त्यांचे विलगीकरण करून उपचार करणे आवश्यक असते. काही रुग्णालयांकडून बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत उपचार करण्यास नकार दिला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे प्रकार घडत आहेत. संबंधित रुग्णालयांनी स्वाईन फ्लुच्या रुग्णांना आवश्यकतेनुसार बेड उपलब्ध करून द्यावेत. रुग्णालयातील राखीव बेड स्वाईन फ्लु रुग्णांना द्यावेत. त्यासाठी सर्व रुग्णालयांना सुचना दिल्या जातील. जी रुग्णालये रुग्णांना नाकारतील त्यांना नोटीस पाठवू, असे डॉ. हंकारे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दि. १ जानेवारी ते दि. ८ आॅक्टोबर पर्यंत एकुण  ७,२२,५३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून ११,२६० जणांना टॅमी फ्लु गोळ्या दिल्या आहेत. त्यापैकी २९९ जणांना स्वाईन फ्लुची बाधा झाली, तर ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.