MBBS साठी ‘तब्बल’ एवढ्या जागांची वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एमबीबीएसला अ‍ॅडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशभरात विविध मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या ४५०० जागांमध्ये वाढ केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चालू वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ३७ नव्या महाविद्यालयांनाही परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

एमसीआयने सुमार शैक्षणिक गुणवत्तेमुळे सहा वैद्यकीय महाविद्यालयांवर बंदी घातली आहे. तर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियानेही ८५० जागा वाढवल्या आहेत. वाढ करण्यात आलेल्या जागांमुळे एमबीबीएसच्या जागांचा आकडा ७४ हजार २५१ झाला आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या एकूण ५२९ झाली आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

धक्कादायक ! कुपोषणामुळे ४ वर्षांत ९ हजार बालकांचा मृत्यू

हवेच्या प्रदुषणामुळे ही होतो अनियमित मासिक पाळीचा त्रास

बोनमॅरो दानामुळे ५ थॅलेसेमियाग्रस्तांना ‘जीवनदान’

बहुगुणी पालकाची भाजी खा ; आरोग्य राखा