सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण : ड्रग्ज प्रकरणात NCB कडून आणखी एकाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणाच्या तपासावर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने अर्थात एनसीबीने (NCB) पुन्हा भर दिला आहे. याप्रकरणी गुरुवारी आणखी एकला अटक केली. जगताप सिंग आनंद असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सहायक दिग्दर्शक ऋषीकेश पवार याला अटक केली होती. यादोघांसह करण सजनानी व राहिला फर्नीचरवाला यांना चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेण्यात आले.

सुशांतसिंहच्या व्यसनांबद्दल या सर्वांना माहिती होते. त्यामुळे त्याबद्दल समोरासमोर बसून त्यांच्याकडून माहिती घेतली जात असल्याचे समजत आहे. जगताप सिंह आनंद हा यापूर्वी अटक केलेल्या करमजित सिंग या तस्कराशी संबंधित असल्याचे समजतय. पवार हा सुशांतला गांजा आणि हशिम, तसेच बॉलिवूडमध्ये अनेकांना ड्रग्ज पुरवत होता.

सुशांतसिंहच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये काम करीत असल्याने तो काही महिने त्याचा रुममेट होता. त्याच्यासह जगताप सिंह हा देखील सुशांतला गांजा व हशिम पुरवत असल्याने त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. न्यायलयीन कोठडीत असलेल्या करण सजनानी, राहिल फर्नीचरवाला यांना जेलमधून एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले.