पुण्यात आणखी एका सहाय्यक आयुक्‍तांची (एसीपी) बदली

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

पुणे पोलिस आयुक्‍तालयात आणखी एका सहाय्यक पोलिस आयुक्‍तांची बृहन्मुंबई येथून बदली करण्यात आली आहे. किशोर प्रभाकर नाईक असे सहाय्यक पोलिस आयुक्‍तांचे नाव आहे. किशोर नाईक यांची बृहन्मुंबई येथे सहाय्यक आयुक्‍त म्हणून बदली आदेशाधीन होती. मात्र, त्यांची आता पुणे पोलिस आयुक्‍तालयात बदली करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’07ad84a6-96fb-11e8-b86c-276438491df8′]

गेल्या काही दिवसांपुर्वीच राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक आयुक्‍त, पोलिस उपायुक्‍त आणि त्यावरील दर्जाच्या पोलिस अधिकार्‍यांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या होत्या. पुणे पोलिस आयुक्‍तालयाचे विभाजन होत असून आता नवीन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालय सुरू होणार आहे. दि. 18 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालय सुरू होणार असल्याची विश्‍वसनीय सुत्रांची माहिती आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयात देखील आणखी काही सहाय्यक आयुक्‍तांच्या नेमणुका होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीची माहिती असणार्‍यांची सहाय्यक आयुक्‍तपदी नेमणुक होणार आहे. किशोर नाईक यांची बृहन्मुंबई येथे आदेशाधीन असलेली बदली रद्द करून त्यांची बदली पुणे पोलिस आयुक्‍तालयात करण्यात आली आहे.