पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयात आणखी एका सहाय्यक आयुक्‍तांची बदली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन-पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात आणखी एका सहाय्यक पोलिस आयुक्‍तांची बदली करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असणारे गणपतराव एस. माडगुळकर यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात बदली करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश गृह विभागाने आज (गुरूवार) काढले आहेत.

सहाय्यक आयुक्‍त गणपतराव माडगुळकर हे पुणे ग्रामीण पोलिस दलात देहूरोड विभागात उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणुन कार्यरत होते. माडगुळकर यांची आता पिंपरी-चिंचवडच्या आयुक्‍तालयात बदली झाली आहे. माडगुळकर यांनी यापुर्वी पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि राज्यात विविध ठिकाणी कर्तव्य बजाविले आहे. पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेत त्यांनी गुंडा स्कॉडचे प्रमुख म्हणुन देखील कर्तव्य बजाविले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी राज्य पोलिस दलातील 23 सहाय्यक पोलिस आयुक्‍तांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यावेळी पुणे दहशतवाद विरोधी पथकातील राम जाधव यांची पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयात बदली करण्यात आली होती. आता माडगुळकर यांची बदली झाली आहे.