दहशतवाद्यांमध्ये खळबळ, ‘कोणीतरी आहे जो एक-एक करून सर्वांना मारतोय…’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – दहशतवाद्यांविरूद्ध सुरक्षा दलाची मोहीम यशाच्या मार्गावर आहे. या दिवसात दहशतवाद्यांचा आणखी एक ऑडिओ चर्चेचा विषय बनला आहे. हिजबुलशी संबंधित असल्याचे स्वत: चे वर्णन करणारे दहशतवादी म्हणतात की, संघटनेत असे कोणीतरी आहे जो एकेक करून सगळ्यांना ठार करत आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, जुनैद हिज्ब आणि शीराज हिज्बपासून विभक्त झाला होता. रियाज नायकूचा मृत्यू झाल्यानंतर जुनैद मुख्य कार्यकारी कमांडरच्या खुर्चीवर असायला हवा होता पण तसे झाले नाही.

प्रथम नावेद बाबूला पकडले गेले, त्यानंतर रियाजला ठार मारले गेले आणि आता जुनैद सेहराई मारले गेले. दहशतवादी म्हणतात की, काही काळापासून दहशतवादी संघटना एकमेकांविरूद्ध काही ऑडिओ टेप जारी करत आहेत. रियाझ नंतर भांडण खुर्चीवरुन तर नसेल ना ?

यापूर्वी रियाझ नायकू बेगपोरा चकमकीत ठार झाल्यानंतरही एक ऑडिओ व्हायरल झाला होता. दहशतवादी संघटना एकमेकांवर दोषारोप करत आहेत. ते स्वत: ला खरा म्हणत आहेत तर इतरांना बनावट म्हणत आहे. त्याचे एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओवरून समोर येत आहे.

व्हायरल ऑडिओ काही काळ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये दहशतवादी संघटना एकमेकांना एजंट म्हणताना ऐकायला मिळू शकतात. टीआरएफ नावाच्या नव्या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचे म्हणणे आहे की हिज्बुल दहशतवादी निष्पाप लोकांना ठार करतात.

त्याचबरोबर, हिज्बुल म्हणतो की, टीआरएफ भारताचा एजंट आहे. यानंतर आणखी एक ऑडिओ आला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की, बेगपोरा चकमकीत टीआरएफचा हात आहे. दहशतवादी संघटना एकमेकांना बनावट म्हणत आहेत.