अभिनेते अन् दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन, बॉलिवूडवर शोककळा

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेते व दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन झाले आहे. तारिक यांनी मुंबईतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार तारिक शाह गेल्या 2 वर्षांपासून मुत्रपिंडाच्या समस्येशी सामना करत होते. मागील काही दिवसांपासून ते डायलिसिसवर होते. तारिक शाह दिग्दर्शक आणि निर्माते देखील होते. त्यांनी जन्म कुंडली, बहार आने तक यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तसेच त्यांनी कडवा सच मालिकेचे दिग्दर्शन केले होते. त्यांनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातही काम केले होते. तारिक शाह अभिनेत्री शोमा आनंद यांचे पती होते. तारिक शाह बऱ्याच काळापासून सिनेइंडस्ट्रीमधून गायब होते. मात्र त्यांची पत्नी शोमा आजही इंडस्ट्रीत कार्यरत आहे.