थिएटरला आणखी एक झटका ! ‘बिग बी’ अमिताभनंतर आता विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ ऑनलाईन रिलीज होणार

पोलिसनामा ऑनलाइन –थिएटर्सला पुन्हा एक मोठा झटका लागू शकतो. कारण आता विद्या बालनचा आगमी सिनेमा शकुंतला देवी ऑनलाईन रिलीज केला जाणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमनं वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे. अद्याप याची रिलीज डेट मात्र निश्चित झालेली नाही.

विद्यानं सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. इंस्टावर एक पोस्ट शेअर करत तिनं लिहिलं की, हे सांगताना आनंद होत आहे की, तुम्ही शकुंतला देवी प्राईम व्हिडीओवर कुटुंबासोबत बघू शकणार आहात. आनंद आहे अशा काळातही तुमचं मनोरंजन करू शकत आहे.”

विद्या बालनचा हा सिनेमा 8 मे रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं रिलीज डेट टाळण्यात आली होती. सिनेमाचं डायरेक्शन अनु मेनन यांनी केलं आहे. चाहतेही अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या प्रतिक्षेत होती. त्यांचीही प्रतिक्षा लवकरच संपेल असं दिसत आहे.

मॅथमॅटेशियन जीनियस शकुंतला देवी यांचा हा बायोपिक आहे. ज्यांच्या अद्भुत प्रतिभेपुढे दुनिया हैराण झाली होती. त्यांची स्टोरी या सिनेमात आहे. मॅथची वंडर गर्ल अशी त्यांची ओळख होती. कोणत्याही यंत्राशिवाय त्या मोठ्या आकडेवारीची गणितं काही सेकंदात सॉल्व करत होत्या.