Coronavirus : डोंबिवलीमध्ये हळदीसह विवाह समारंभास हजेरी लावणार्‍या आणखी एका महिलेला ‘कोरोना’ची लागण

डोंबिवली : पोलिसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात घातले असून देशातही यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने देशभरात लॉकडाऊन केले असूनही नागरिक त्याचे पालन करत नसताना दिसून येत आहेत. तर डोंबिवली येथे एका महिलेचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आली असून ही महिला डोंबिवली येथील म्हात्रेनगर येथे हळद आणि लग्न समारंभाला गेली होती. घटनेनंतर पोलिसांनी येथील मढवी बंगला येथील भाग लॉकडाऊन केले असून महापौर विनिता राणे यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. कारण झालेल्या संभारंभात आपल्या पतीसह गेल्या होत्या. आता या समारंभातील किती लोकांना कोरोनाची लागण झाली आहे याबाबत शोध सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली येथील म्हात्रेनगर येथे १८ मार्चला ९मार्चला जुनी डोंबिवली ग्राउंड येथे विवाह सोहळा झाला असताना यात एक एनआरआय तरुणही होता ज्याला कोरोनाची लागण झाली होती. तसेच महापौर विनिता राणे याही या सोहळ्याला आपल्या पतीसह गेल्या होत्या. या समारंभात खूप लोकं असल्याने संक्रमण पसरण्याचा धोका जास्त आहे. अद्याप किती लोकांना लागण झाली आहे, याबद्दल समजलेले नाही.

३ गुन्हे दाखल

याप्रकरणी पोलिसांनी दखल घेतली असून संक्रमित रोग पसरवल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डोंबिवलीत ३ गुन्हे दाखल केले असून कोरोना रुग्णावर गुन्हा दाखल केलाच पण ज्या व्यक्तीची जागा होती त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंडविधान कलम १८८, २६९, २७९, २७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.