Sachin Vaze : TRP घोटाळ्याप्रकरणी 30 लाखाची लाच घेतल्याने ED करणार चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंबानीच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी NIA ने अटक केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंची रवानगी कारागृहात झाली आहे. मात्र आता वाझेंचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. टीआरपी घोटाळ्यातही (TRP scam ) वाझेंनी 30 लाख रुपये घेतले होते, अशी माहिती ED च्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ED आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलकडून सचिन वाझे यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाच्या मदतीने 30 लाखाची लाच घेतल्याचा आरोप आहे. TRP घोटाळ्याचा तपास करताना कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह यांना त्रास न देण्याच्या नावाखाली वाझेंनी लाच घेतल्याची चर्चा आहे. रिपब्लिक टीव्हीचा TRP वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगितले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या TRP मोठी वाढ झाल्याचे दिसून आले होेते. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी सचिन वाझे टोळी टीआरपी घोटाळ्यात सहभागी असल्याचा दावा करणारे ट्विट महिनाभरापूर्वीच केले होते.