अभिमानास्पद ! अमेरिकेच्या ‘टेक वर्ल्ड’मध्ये आणखी एक भारतीय ‘प्रतिभा’वंत ‘टॉप’ वर, शंकरलिंगम बनले Zoom चे इंजिनिअरिंग हेड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत आणखी एक भारतीय प्रतिभाशाली व्यक्ती कॉर्पोरेट जगताच्या उच्चस्थानी पोहचली आहे. व्हिडिओ चॅट अ‍ॅप संचालन करणारी कंपनी झूम इन्कने मुळ भारतीय वंशाचे के वेल्चमी शंकरलिंगम यांना इंजिनियरिंगचे हेड बनवले आहे. शंकरलिंगम आता थेट झूम व्हिडिओ कम्युनिकेशन इन्कचे सीईओ एरिक एस युआन यांना रिपोर्ट करतील. ते कंपनीच्या इंजिनियंरिंग आणि प्रॉडक्ट विभागाचे नवे प्रेसिडेंट बनले आहेत. ते कंपनीच्या इंजिनियरिंग प्रॉडक्ट आणि डेव्हलपमेन्ट टीमचे कामकाज पाहतील. त्यांची नियुक्ती 12 जूनपासून प्रभावी होणार आहे.

भारतीय टॅलेंटचा डंका
अमेरिकेच्या टेक जगतात मुळ भारतीय वंशाच्या व्यक्ती सतत आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापासून ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेलापर्यंत भारतीय प्रतिभावंतांचे महत्व जग जाणत आहे. शंकरलिंगम यांनी सुमारे 9 वर्षापर्यंत एक सॉफ्टवेयर कंपनी व्हीएमवेअरमध्ये काम केले होते, यानंतर त्यांनी व्हिडिओ चॅट अ‍ॅप झूम संचालित करणारी कंपनी ज्वाईन केली. व्हीएमवेअरमध्ये शंकरलिंगम क्लाउड सर्व्हिसेस डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन्स सीनियर व्हाईस प्रेसिडेंट होते. या कंपनीच्या आधी वेबएक्समध्ये इंजिनियरिंग आणि टेक्निकल ऑपरेशनचे व्हाईस प्रेसिडेंट होते.

चेन्नइत झाले शिक्षण
शंकरलिंगम यांच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार त्यांना हार्डवेयर, सॉफ्टवेयर आणि सर्व्हिस इंडस्ट्रीचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी भारतात चेन्नईच्या अन्ना युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये बीई केले आहे. यानंतर त्यांनी 1989-90 मध्ये अमेरिकेच्या नॉर्दर्न इलिनॉईस युनिव्हर्सिटीमधून कम्प्यूटर सायन्समध्ये एमएस केले. त्यांनी 1993 आणि 1995 मध्ये स्टोनी ब्रुक युनिव्हर्सिटीमूधन सुद्धा बिझनेस आणि पॉलिसीमधून एमएस केले.

काही दिवसांपूर्वीच झूम अ‍ॅपवर प्रायव्हसीबाबत भारतासह अनेक देशात प्रश्न उपस्थित झाला होता. तरीही लॉकडाऊनमध्ये जगभरात हे अ‍ॅप लोकप्रिय ठरले आहे. डिसेंबर 2019 मध्ये झूमवर केवळ 1 करोड डेली मीटिंग होत होत्या, परंतु एप्रिल पर्यंत हा आकडा वाढून 30 करोडवर पोहचला. झूमने नुकताच या अ‍ॅपचे सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. कंपनीने यूजर्सला म्हटले आहे की, त्यांनी हे अ‍ॅप अपडेट करावे आणि प्रत्येक झूम मीटिंगसाठी एक पासवर्ड ठरवावा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like