काँग्रेसच्या संकटांमध्ये वाढ ; ‘या’ बड्या नेत्याची खासदारकी वाचविणं अवघड

नई दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही काँग्रेससमोरील संकटं काही टळत नाहीत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्यामुळे लोकसभेमधील विरोधी पक्षनेत्याचा दर्जा मिळणार नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देण्यावर अडून बसल्याने त्यांच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न देखील पक्षाच्या समोर उभा टाकला आहे. त्यात मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्याच्या सरकारवर टांगती तलवार आहे. त्यासोबतच काँग्रेससमोर एक मोठं संकट येणार आहे.

भाजप पुढचे वर्ष संपेपर्यंत राज्यसभेत पूर्ण बहुमताचा आकडा गाठेल, हे काँग्रेसला परवडणार नाही. कारण भाजपला राज्यसभेत रोखणं अवघड होणार आहे. आता राज्यसभेत एनडीएकडे १०२ सदस्य आहेत तर यूपीएकडे ६६ आहेत. इतर पक्षांकडे ६६ सदस्य आहेत. पुढील नोव्हेंबरपर्यंत एनडीएकडे १८ सदस्य आणखीन जोडले जातील. एनडीएला आणखीन इतर पक्षांचा देखील पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे काँग्रेसच्या संकाटात वाढ होणार आहे.

पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशमधून रिक्त होणाऱ्या १० जागेवर बहुतांशी जागा हे भाजपचं जिंकेल. यात ९ जागा या विरोधी पक्षाकडे आहेत. यात काही समाजवादी पक्षाकडे, बसपाकडे तर काँग्रेस पक्षाकडे आहेत. त्यासोबतच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आसाममधून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा कार्यकाळही जूनमध्ये संपणार आहे. मनमोहन सिंग यांच्यासारखे आर्थिक तज्ज्ञ राज्यसभेत न असणे काँग्रेसला मोठा झटका असेल. आसाम विधानसभेत काँग्रेसची जी संख्या आहे त्या संख्यावरून मनमोहन सिंग यांची जागा काँग्रेस वाचवू शकत नाही. त्यासोबतच आसाम मधूनच कांग्रेसचे राज्यसभा सदस्य एस. कुजूर पण 14 जूनला निवृत्त होत आहेत. यांची जागापण भाजपच्या खात्यात जाणे निश्चित आहे. पुढच्या वर्षी २२ राज्यातील ७२ जागांवर राज्यसभेची निवडणूक होईल. त्यात काँग्रेसला मनमोहन सिंग यांना राज्यसभेवर पाठवण्याची संधी आहे. पण त्यासाठी जेडीएसची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. परंतु त्यातही काँग्रेसला मनमोहन सिंह आणि एचडी देवगौडा यांच्यात निवड करावी लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संकटात आणखी वाढ होणार आहे.