काय सांगता ! होय, ‘बोल्ट’चं रेकॉर्ड तोडणार्‍या ‘गौडा’ पेक्षाही वेगवान धावला ‘निशांत’, 9.51 सेकंदामध्ये 100 मीटर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कम्बाला या पारंपारिक रेडा पळवण्याच्या धावेत उसेन बोल्टच्या वेगाचा देखील रेकॉर्ड तोडणाऱ्या श्रीनिवास गौडाचा देखील रेकॉर्ड तुटला आहे. श्रीनिवास गौडा याने 13.62 सेकंदात 142.5 मीटरचे अंतर कापल्याने त्याच्यावर सर्वांकडून कौतूकांचा वर्षाव होत होता. याच खेळात निशांत शेट्टी नावाच्या एका युवकाने 13.68 सेकंदात 143 मीटरचे अंतर कापून श्रीनिवास गौडा याचा रेकॉर्ड मोडला.

000_021820030743.jpg

कर्नाटकात गौडा यांनी पाण्याने भरलेल्या शेतात उघड्या पायाने धावण्याच्या स्पर्धेत फक्त 13.62 सेकंदात 145 मीटरचे अंतर कापले ज्यानंतर दावा करण्यात आला की त्याने फक्त 9.55 सेकंदात 100 मीटरचे अंतर पार केले. तर निशांत शेट्टी याने 13.68 सेकंदात 143 मीटरचे अंतर कापले असा दावा करण्यात आला. त्याने 100 मीटरचे अंतर 951 सेकंदात पार केले.

आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट उसेन बोल्ट यांने 100 मीटर अंतर 9.58 सेकंदात पूर्ण करुन जागतिक विक्रम आपल्या नावे केला होता. अशात निशांत शेट्टीने गौडा आणि बोल्ट या दोघांचा विक्रम मोडला.

gowda_755_1581952469_021820015815.jpeg

ट्रायलला गेला नाही गौडा –
श्रीनिवास गौडाची धाव पाहून बंगळूरु स्थित भारतीय खेळ प्राधिकरणाने त्याला ट्रायलसाठी बोलावले होते परंतु गौडा यांनी ट्रायल देण्यास नकार दिला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रशिक्षकांच्या देखरेखीत ट्रायल करण्याचे निर्देश दिले होते. परंतु गौडा यांनी ट्रायल देण्यास नकार दिला आहे.

काँग्रेस नेते शशि थरुर आणि व्यावसायिक आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट करत क्रिडा मंत्रालयाला आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाला गौडा यांची मदत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर किरेन रिजिजू म्हणाले होते की पारंपारिक खेळाची तुलना ऑलंपिकमधील खेळांशी करणं चुकीचं आहे.

You might also like