वंचित बहुजन आघाडी’ची दुसरी यादी जाहीर, 180 उमेदवार रिंगणात

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – विधानसभेसाठी साथ सोडणाऱ्या एमआयएमवर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने कुरघोडी केली. पहिल्याच यादीमध्ये 22 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केले होते. त्यानंतर वंचितने दुसरी यादी जाहीर केली असून यामध्ये 180 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. उर्वरीत उमेदवारांची तिसरी यादी उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर होईल असे प्रकाश आबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

एमआयएमने वंचितसोबत युती तोडत स्वतंत्र लढण्याची तयारी दर्शवली. एमआयएमने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत पुन्हा वंचितसोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, तरीही वंचित आघाडीसाठी प्रतिक्षेत होती. मात्र, आज प्रकाश आंबेडकर यांनी अखेर वंचितची दुसरी यादी जाहीर केली. त्यामुळे वंचित आणि एमआयएमच्या युतीच्या अपक्षा धुसर झाल्या आहेत.

वंचित बुजन आघाडीने आज जाहीर केलेल्या यादीमध्ये कर्जत जामखेडमधून अरुण जाधव, लातूर शहरातून मनियार राजासाब, जळगावमधून शेख शफीअब्दुल नबीशेख, शिवाजीनगर अनिल कुऱ्हाडे यांच्यासह 22 मतदारसंघातून उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये पुण्यातील जगांचाही समावेश आहे.

Visit : Policenama.com