पुरातत्व तज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का ! उज्जैनमधील ‘महाकाल’ मंदिराखाली सापडला ‘खजिना’

उज्जैन : पोलीसनामा ऑनलाइन – उज्जैनमधील प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या mahakal mandir परिसरात बांधकामासाठी खोदकाम सुरु असताना काही प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत.
तसेच मंदिराच्या mahakal mandir जमिनीखाली काही जुन्या भिंतीही आढळल्या आहेत.

खोदकामात सापडलेल्या मूर्ती 11 आणि 12 शतका दरम्यानच्या आहेत. खोदकामादरम्यान, अशा वस्तू पाहून तज्ज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. येथे सापडलेले अवशेष हे शुंग वंशाच्या राजवटीतील असावेत, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

महाकाल मंदिराचा विस्तार करण्यासाठी खोदकाम सुरू आहे. यादरम्यान येथे एक प्राचीन मूर्ती सापडली. या अवशेषांची माहिती सांस्कृतिक मंत्रालयाला दिली आहे. दरम्यान राज्य पुरातत्व विभागाच्या पथकाने मंदिरांचा विविध भागाचा दौरा केला.

डॉ. रमेश यादव, डॉ. ध्रुवेंद्र सिंह जोधा, सर्वेक्षक योगेश पाल आणि पुरातत्वतज्ज्ञ डॉ. रमेश कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. मंदिराच्या उत्तर अन् दक्षिण भागात नवे अवशेष सापडले आहेत.
डॉ. रमेश यादव म्हणाले की, महाकालेश्वर मंदिराच्या खाली 11 व्या अऩ् 12 व्या शतकातील मंदिर दबलेले असण्याची शक्यता आहे.

मंदिराच्या आवारात अनेक अवशेष पाहिले आहेत. त्यात खांब, मंदिराच्या कळसाचा भाग, नक्षिकाम केलेले दगडी रथ आदीचा समावेश आहे. यातील अनेक अवशेष हे उत्तर भागात आहेत. पुरातत्ववाद्यांना मंदिराच्या अस्तित्वाचा संकेत देणारे काही भागही सापडले आहेत.

मंदिराच्या दक्षिण भागात जमिनीखाली 4 मीटर खाली आम्हाला एका भिंतीचे अवशेष सापडले आहेत. 2020 मध्येही मंदिराच्या परिसरात केलेल्या खोदकामात काही अवशेष सापडले होते.
तर पुरातत्व शास्त्रज्ञ रमेश यादव म्हणाले की, याबाबत लवकरच एक विस्तृत अहवाल तयार करून तो संस्कृती मंत्रालयाला पाठवण्यात येईल.

Also Read This : 

 

पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे सरकारची, भाजप नेत्याची राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर जोरदार टीका

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

Maharashtra : 8 वर्षाच्या मुलाकडून साफ करून घेतले कोरोना रूग्णांचे टॉयलेट, वायरल झाला व्हिडीओ

 

Weight loss : वजन कमी करण्यासाठी ‘जीम’ला जाऊ शकत नसाल तर OK; घरातील कामे करून देखील बर्न होतात कॅलरी, जाणून घ्या

 

सर्वोच्च न्यायालयाचे CBSE अन् ICSE बोर्डाला स्पष्ट आदेश, म्हणाले – ’12 वीच्या निकालासाठीचे निकष 2 आठवड्यात सांगा’

 

Dahi-Kishmis Benefits : तंदुरूस्त रहायचे असल्यास दह्यामध्ये मनुक्यासोबत मिक्स करा फक्ती ‘ही’ एक गोष्ट, मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या