home page top 1

खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर व्हॉट्सअ‍ॅपचं ‘हे’ नवं फिचर लाॅंच ; युजर्सना होणार मोठा फायदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या रोजच्या वापरातील व्हॉट्सअ‍ॅप हे महत्त्वाचे अ‍ॅप आहे. त्यात दररोज नवनवीन फिचर येत आहेत. ज्याने व्हॉट्सअ‍ॅप ग्राहकांना नवीन सुविधा मिळत आहेत. असंच एक नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या ग्राहकांसाठी समोर आणले आहे. या नवीन फिचरचे नाव Continuous Audio Message Playback असं आहे.

या फिचर द्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना वॉईस मॅसेज पाठवू शकता. तुम्ही म्हणाल हे फिचर आधीपण होते यात काय नवीन. परंतू नवीन असं की ज्याला तुम्ही मॅसेज करणार त्याला तो ऑडिओ स्वरूपात डाऊनलोड नाही करावा लागणार, तर तोच मॅसेज त्यांना लिखीत स्वरूपात मिळणार आहे. जसं कोणते मॅसेज आले तर ते एका पाठोपाठ प्ले होतील, तसंच दिसतील.

मिळालेल्या माहितीनुसार, हे फिचर व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईड अ‍ॅप मध्ये वर्जन 2.19.150 वर आहे. तसंच लेटेस्ट स्टेबल वर्जनमध्येही उपलब्ध आहे. त्यासोबत ग्राहक गुगल प्लेवर जाऊन आपले व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून घेऊ शकतात. त्यासोबत व्हॉट्सअ‍ॅपवर अजून काही नवीन फिचर येत आहेत, त्याचाही फायदा ग्राहक घेऊ शकतात.

दरम्यान, नवीन फिचर्समुळे ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स फेसबुकवर स्टोरी स्वरूपात शेयर करता येणार आहे. यासोबत व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या ग्राहकांना प्रोफाईल सेक्शनमध्ये डेडिकेटेड क्यूआर कोड बटनही देत आहे. ज्याचा ग्राहकांना फायदा होत आहे.

Loading...
You might also like