पुण्याजवळ आणखी एक नवी महापालिका, अजित पवारांचे स्पष्ट संकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराजवळ असलेल्या वाघोली, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक यांसह अनेक गावांचा समावेश करून नवीन महानगरपालिका स्थापना करण्यातबाबत शासन सकारत्मक आहे अशी माहिती विधानसभेत दिली आहे. पुणे शहरालगतच्या वाघोली भागातील रस्ते वाहतूक, पाणीपुरवठा अश्या समस्यांबाबत सदस्य अशोक पवार यांनी सूचना मंडली होती. शहरालगत पिंपरी चिंचवडनंतर आता, आणखी एक महापालिका निर्माण होणार असल्याचे दिसून येते. असे उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पावर म्हणाले, पुणे व पिंपरी-चिंचवड सोडून बाकीचा इतर भाग पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत आला आहे. पुणे शहरात काही गावे समाविष्ट करण्यासाठी त्या भागातील लोकही आग्रही मागणी करत आहेत. या कामाला गती देण्याची गरज आहे. वाघोली गाव शहरालगत असल्याने वेगाने नागरीकरण होत आहे. वाढत्या नागरीकरणामुळे सध्याचा 2.5 एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वाढीव 5 एमएलडी पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे.

नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी वाघोलीतील घनकचरा व्यवस्थापनाकरिता प्राधिकरणाने वाघोली ग्रामपंचायतीला पंधरा कचरावाहू वाहने उपलब्ध करून दिली आहेत. तसेच हवेली व मुळशी तालुक्यातील 8 गावांकरिता घनकचरा व्यवस्थापनासाठी पूर्वसुधारणेचा अहवाल तयार करून घेण्याची कार्यवाही प्राधिकरणाच्या स्तरावर सुरू आहे. तसेच पुणे-शिरूर -अहमदनगर या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चार पदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशी माहिती दिली आहे. यावेळी बबनराव पाचपुते, राहुल कुल, अशोक पवार, भीमराव तापकीर यांनी चर्चेत सहभाग दर्शवला होता.