ओळखीच्या व्यक्तीने दाभोलकरांना नमस्कार केला…आणि मारेकऱ्यांनी गोळ्या घातल्या

औरंगाबाद : पोलीसनामा 

हेच का ते डॉ. नरेंद्र दाभोलकर? अशी शंका मारेकऱ्यांना गोळ्या झाडण्यापूर्वी आली होती. मात्र, त्याच वेळी शेजारून जाणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीने आदबीने दाभोलकरांना म्हटले नमस्कार दाभोलकर साहेब…आणि मारेकऱ्यांची शंका दूर झाली. गोळ्या झाडण्यापूर्वी शरद कळसकर हा साशंक होता. मात्र, अशापद्धतीने शंका दूर झाल्यानंतर पहिली गोळी शरद कळसकरने तर दुसरी गोळी सचिन अंदुरेने झाडली. तपासयंत्रणांना तशी कबुली या दोघांनी दिली आहे. सचिन अंदुरे याने अवघ्या दीड दिवसांत तपास यंत्रणेपुढे तोंड उघडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

[amazon_link asins=’8179925919,0062641549′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e50ad3f-ab5c-11e8-9e43-b7be6a0f40f7′]

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील महर्षी वि. रा. शिंदे पुलावर मॉर्निंग वॉक करीत असताना  मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याप्रकरणाला पाच वर्षे उलटली तरी मारेकरी पोलीस आणि सीबीआयला सापडत नव्हते. ९ ऑगस्ट रोजी दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपारा येथे शस्त्रांचा साठा जप्त केला होता. यावेळी वैभव राऊत, शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या तिघांना अटक केली होती. शरद कळसकरच्या चौकशीमध्ये औरंगाबाद येथील सचिन अंदुरे या संशयिताचे नाव समोर आले. १४ ऑगस्ट रोजी सचिनला एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले होते. दोन दिवस त्याची चौकशी केल्यानंतर १६ ऑगस्टर रोजी त्याला पुन्हा एटीएसच्या पथकाने औरंगाबादला घरी आणून सोडले होते. त्यानंतर काही वेळातच सीबीआयच्या पथकाने सचिन अंदुरेला अटक करीत पुण्याला नेले. आता सचिन सीबीआयच्या कोठडीत आहे. सचिनला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीमध्ये दीड दिवसानंतर त्याचे तोंड उघडण्यात सीबीआयला यश आले. त्याने हत्येचा पाढा तपास यंत्रणांपुढे वाचला.

शाळा, महाविद्यालयासमोरील रोडरोमिओंचा बंदोबस्त

१९ ऑगस्ट २०१३च्या रात्री शरद व सचिन बसने पुण्याला गेले. या ठिकाणी त्यांच्यासाठी दुचाकीची व्यवस्था करण्यात आली होती. मॉर्निंग वॉकसाठी डॉ. दाभोलकर बाहेर निघाल्यानंतर त्यांची हत्या करायची होती. यासाठी संशय येऊ नये म्हणून सचिन व शरदने देखील ट्रॅकसूट घातले होते. परंतु, गोळ्या झाडण्यापूर्वी डॉ. दाभोलकर यांना ओळखण्याबाबत दोघांच्याही मनात शंका आली. मात्र, त्याच वेळी एका परिचिताने दाभोलकरांना आवाज देत नमस्कार केला आणि शरद आणि सचिनने गोळ्या झाडल्या. यानंतर त्यांनी अतिशय शांतपणे दुचाकी सांगितलेल्या ठिकाणी सोडून बसने ते पुन्हा औरंगाबादला परतले, अशी माहिती सचिनने तपास यंत्रणांना दिल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.
मारेकऱ्यांनी डॉ. दाभोलकर, गौरी लंकेश यांच्यावर एकाच पिस्तूलातून गाेळ्या झाडल्या

सांगली : एटीएसकडून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात चौकशी