आणखी एक PNB घोटाळा, मारुती सुझुकीच्या माजी व्यवस्थापकीय संचालकाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी कार बनविणारी कंपनी मारुती सुझुकीच्या माजी व्यवस्थापकीय संचालक जगदीश खट्टर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषणने (CBI) फसवणूकीच्या प्रकरणात अटक केली आहे. CBI ने दाखल केलेल्या FIR नुसार खट्टर आणि कंपनी कारनेशन ऑटो इंडिया यांना 110 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. जगदीश खट्टर 1993 ते 2007 पर्यंत मारुतीमध्ये कार्यरत होते. 2007 मध्ये खट्टर एमडीच्या पदावरून निवृत्त झाले. त्याच वेळी 2008 मध्ये त्यांनी कारनेश ही नवीन कंपनी सुरु केली.

खट्टर यांनी सुरु केलेली कंपनी कार अ‍ॅक्सेसरीज आणि जुन्या कार विक्रीचा व्यवसाय करते कारनेशनने 2009 मध्ये पंजाब नॅशनल बँकेकडून 170 कोटी रुपयाचे कर्ज घेतले होते. 2015 मध्ये हे कर्ज एनपीए म्हणून घोषित करण्यात आले. यातून पीएनबीला 110 कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणात पीएनबीने गुन्हेगारी षडयंत्र आणि फसवणुकीचा खटला दाखल केला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे सीबीआयने एफआयआर नोंदविला आहे. लवकरच या प्रकरणी बऱ्याच लोकांची चौकशी केली जाणार आहे. सीबीआयने त्यांच्यावर आर्थिक व्यवहारात घोटाळ्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याबरोबर इतर काही अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूक, बनावट आणि गुन्हेगारी कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/