सातारा पोलीस दलातील आणखी एक पोलीस एसीबीच्या जाळ्यात

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

सातारा पोलीस दलातील दहिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षकला १३ हजारांची लाच घेतना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गाडी घालून चिरडल्याची घटना ताजी असतानाच, म्हसवड पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षकाला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. या दोन कारवायांमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b98b0be6-9cae-11e8-9867-092a20a68982′]

म्हसवड पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक बबन पवार असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

गुटखा प्रकरणातील आरोपीला  जामीन देण्यासाठी मदत केल्याप्रकरणी साडेचार हजारांच्या लाचेची मागणी बबन पवार यांनी केली. तडजोडीमध्ये एक हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे केली. पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून बबन पवारला पैसे घेताना रंगेहाथ पकडले.

तर, आज सकाळी दहिवडी पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक सतिश राजाराम दबडे (वय-५५) याला तेरा हजारांची लाच घेताना अटक करण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. मात्र, लाचलुचपत प्रतिबंध पथकाने सापळा रचल्याचे लक्षात येताच दबडे याने पथकाच्या दोन पोलिसांवर गाडी घालून पळून गेला. या घटनेत एसीबीचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf2d9c7c-9cae-11e8-a8fc-e7d733dfc531′]

आज दिवसभरात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दोन कारवायांमध्ये सातारा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. या घटनेमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

संबधित बातमी
साताऱ्यात थरार….’ट्रॅप’ वेळी फौजदाराने एसीबीच्या दोन पोलिसांना चिरडलं