RJ : आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यानं केली ‘आत्महत्या’, 10 दिवसांत 4 पोलिसांनी घेतली ‘फाशी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थान पोलिसांत पोलिसांच्या आत्महत्येची प्रकरणे थांबण्याचे नाव घेतच नाहीत. अवघ्या दहा दिवसांत चार पोलिसांनी फाशी घेतली आहे. सध्या एक नवीन प्रकरण जैसलमेर जिल्ह्यातून समोर आले आहे. जैसलमेर पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलने फाशी घेतली असून त्याचा मृतदेह एका हॉटेलमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला.

कॉन्स्टेबल मायाराम मीना असे मृताचे नाव आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह खाली काढून शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. मिळालेल्या माहितीनुसार, जैसलमेरच्या पोखरणमध्ये पॉवर ग्रीडवर ड्यूटीवर असलेल्या मायाराम मीना यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. कॉन्स्टेबलच्या आत्महत्येची माहिती मिळताच जैसलमेरच्या एसपी डॉ. किरण कंग देखील घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली.

23 मे रोजी चूरू जिल्ह्यातील राजगडचे पोलीस अधिकारी विष्णुदत्त बिश्नोई यांनी फाशी घेतली असून त्यांचा मृतदेह सरकारी निवासस्थानावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर दौसा जिल्ह्यातील संथाल पोलिस ठाण्यात तैनात हेड कॉन्स्टेबल गिरीराज यांनी आत्महत्या केली. याशिवाय 26 मे रोजी श्रीगंगानगर गार्ड हवालदार कमांडर जसविंदर सिंग यांनी स्वत:ला गोळी घातली, तथापि त्यांचा जीव वाचला आहे.