Coronavirus : राज्य पोलीस दलातील 8 बळी ! ‘कोरोना’मुळे सहायक पोलिस उप निरीक्षकाचा मृत्यू, आतापर्यंत 714 पोलिसांना ‘लागण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबईसह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे़ रविवारी कोरोना बाधित आणखी एका पोलीस अधिकार्‍याचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत कोरोना बाधित 8 पोलिसांचा मृत्यु झाला आहे. मुंबईतील विनोबा भावे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी मृत्यु झाला.

शनिवारी नाशिकमधील कार्यरत असलेल्या हेड कॉन्स्टेबलचा मृत्यु झाला होता. आतापर्यंत राज्यात 714 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 81 पोलीस अधिकारी आणि 633 पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कोरोना बाधितांपैकी 8 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात मुंबईतील 5 आणि पुणे, सोलापूर आणि नाशिकमधील प्रत्येकी एकाचा पोलीस कर्मचार्‍याचा समावेश आहे.