विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यात ,पंढरपूरमध्ये साकारतेय दुसरे रुक्मिणी मंदिर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन
विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर तेथे पगारी पुजारी नेमण्यात आले आहेत . त्यामुळे अनेक वर्षे या मंदिरात सेवा करणाऱ्या उत्पात समाजाला येथे  येऊन पारंपरिक कुळाचार करायलाही प्रतिबंध करण्यात आला आहे. असे या समाजाचे म्हणणे आहे.त्यामुळे  उत्पात समाजाने स्वतंत्र पणे मंदिरात रुक्मिणी माता मंदिराची उभारणी केली असून येत्या घटस्थापनेला या मंदिरात रुक्मिणी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

 [amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7f08e7cf-cb12-11e8-8176-f5bfea5475f9′]

उत्पातांनी पंढरपुरात उभारलेल्या प्रती रुक्मिणी मंदिरात विठ्ठल मंदिराप्रमाणे सर्व विधी होणार आहेत. मात्र, सर्वसामान्य विठ्ठलभक्तांची पावले या मंदिराकडे वळणार का?, या मंदिरातही विठ्ठल मंदिराप्रमाणे भाविकांची गर्दी होणार का?, या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे.
[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B00KGZZ824′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a5347b3e-cb12-11e8-9f74-a5c29fa3397b’]

विठ्ठल मंदिर शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर येथे पगारी पूजारी नेमण्यात आले आहेत. या पूजेमध्ये पारंपरिक पद्धतीने विधी व नित्योपचार होत नसल्याचे उत्पात समाजाचे म्हणणे आहे. यातच तीन वर्षांपूर्वी मंदिरावरचा ताबा गेल्यानंतर उत्पात समाजाला मंदिरात येऊन पारंपरिक कुळाचार करायलाही प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यानंतर समाजाने त्यांच्या वसिष्ठ आश्रम येथील मठामध्येच रूक्मिणीचे छोटेसे मंदिर बनविण्याचे काम सुरु केले. यात गाभारा बनवून घटस्थापनेच्या दिवशी रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे, असे उत्पात समाजाकडून सांगण्यात आले.

चिखली पोलीस ठाण्यात ८ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

हा आमचा देव्हारा: उत्पात

हे मंदिर उत्पात समाजाचा देव्हारा असून येथे मूर्तीवर शेकडो वर्षांपासून चालत आलेले देवीचे दैनंदिन नित्योपचार व विधी केले जातील. हे मंदिर सर्वांसाठी खुले असून यास प्रती मंदिर समजू नये. शहरात उत्पात समाजाची १२० घरे असून त्यांना आता या मंदिरात आपले कुळाचार करता येतील, असे उदय व ऋषिकेश उत्पात यांनी स्पष्ट केले.