काँग्रेसला दे धक्का ! ‘या’ राज्याचे माजी मुख्यमंत्री करणार वेगळ्या पक्षाची घोषणा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे सध्या खूपच वाईट दिवस सुरु आहेत. राष्ट्रीय नेतृत्वाचा अभाव आणि त्यात पक्षांतर या दोनीही गोष्टींना काँग्रेसला सध्या तोंड द्यावे लागत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेससमोरील अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही आहेत. हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात दीर्घकाळापासून काँग्रेसचा चेहरा असलेले भूपेंद्र सिंह हुड्डा रविवारी समर्थकांच्या एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित करणार असून, या सभेत हुड्डा हे वेगळ्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

भूपेंद्र सिंह हुड्डा हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर फाटाफूट पहायला मिळत आहे.गेल्या दोन दिवसांपासून भूपेंद्र सिंह हुड्डा यांची दिल्लीमध्ये खलबत सुरु होती त्यामुळे यावेळी ते नव्या पक्षाची घोषणा करतील किंवा राज्यात इतर पक्षांक्षी आघाडी करून निवडणूक लढवतील, असे सांगण्यात येत आहे.

येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला इतर राज्यांमध्ये विजय मिळवायचा असेल तर नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर काँग्रेस पक्ष नेतृत्वाची जबाबदार टाकणार नाही अशी चर्चा होती.

मात्र दीर्घकाळापासून काँग्रेसमध्ये असलेल्या भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणूक लढवण्यात यावी आणि त्यांनाच पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उमेदवार घोषित करावे, असा हुड्डा यांच्या समर्थकांचा आग्रह आहे.त्यामुळे आज होणाऱ्या सभेत हुड्डा काय निर्णय घेतात याकडे सर्व स्थानिक पक्षांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –