सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अमृता फडणवीसांचं ‘शायराना’ अंदाजात आणखी एक Tweet ! म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस विरूद्ध बिहार पोलीस असा वाद रंगला आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही वादात उडी घेतली आणि त्यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली. यानंतर आता शिवसेना आणि अमृता फडणवीस यांच्यात जुंपताना दिसत आहे. मुंबईत राहणं असुरक्षित वाटत असल्याचं अमृता म्हणाल्या होत्या. यानंतर शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी अमृता यांना राज्य सोडण्याचा सल्ला दिला होता. अमृता यांच्या ट्विटनंतर त्यांच्यावर खूप टीका होताना दिसली. अशात आता त्यांनी पुन्हा एक ट्विट केलं आहे.

यावेळी आपल्या ट्विटमध्ये शायरीचा वापर करत अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकणावर भाष्य केलं आहे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.

अमृता यांनी लिहला की, “रहते हैं शीषमहलों में जो, वो अवाम से दूरी बनाया करते है !
मगर हम तो वो शक्स है, जो पत्थरों से घर बनाया करते है !
भूल गए है वो कांच के घरों में रहकर खुद, छुपाएं कुछ छुपता नहीं !
बम फरेबियों को ठोकरों में, और सच को सीने से लगाया करते है !”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like