जीमेलचे आणखी एक अनोखे फिचर : मेल आपोआप होणार डिलीट 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

गुगलने  वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या जीमेल च्या सुविधांमध्ये बदल केले होते. आता मात्र गुगलने जीमेलच्या अॅप्समध्ये आणखी एक अनोखे फिचर वाढविले आहे. कॉन्फिडेंटल मोड असे या सुविधेचे नाव असून तो यापूर्वी वेबसाईटवरच देण्यात आला होता. आता तो अँड्रॉईड आणि आयओएसवरही उपलब्ध होणार आहे.
[amazon_link asins=’B073JYVKNX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’beeb081d-a2e3-11e8-bd0b-33805c44eaa4′]

याबाबत अधिक माहिती आशिकी, कॉन्फिडेंटल मोड चालू केल्यानंतर तुम्ही दुसऱ्याला मेल पाठविला असेल तर तो ठराविक वेळेनंतर आपोआप डिलीट होणार आहे. म्हणजेच तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला या मोडमधून मेल केला असेल आणि या मेलची वेळ मर्यादा एक दिवसाची ठेवली असेल तर तो २४ तासांनी त्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून आपोआप डिलीट होणार आहे. ही सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली आहे. यासाठी हे अॅप अपडेट करण्याची गरजही नाही. गुगल आपल्या सर्व्हरसाईड अपडेटवरून ते करत आहे.

यासाठी कॉन्फिडेंटल मोड मध्ये मेल करण्यासाठी आपल्याला केवळ मेल करताना उजव्या बाजुला दिलेल्या तीन डॉटच्या बटनावर क्लीक करावे लागेल. तेथे कॉन्फिडेंटल मोडचा पर्याय दिसेल. तेथे क्लीक केल्यानंतर तुम्ही कमीतकमी १ दिवस ते ५ वर्षांपर्यंत मेलची मर्यादा सेट करू शकता. हा मेल ज्याला पाठविला आहे तो व्यक्ती, हा मेल पुढे फॉरवर्ड, कॉपी, पेस्ट किंवा डाऊनलोड करु शकणार नाही.
[amazon_link asins=’B06Y63B51W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c525459d-a2e3-11e8-869b-a1105513efba’]

जीमेलच्या या अनोख्या फिचरमुळे कधी कधी मेल न वाचताच डिलीट होऊ शकतात. यासाठी सर्वाना रोज मेल चेक करावे लागतील असे दिसून येते.