स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी; ५६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पाेलीसनामा ऑनलाईन

शहरामध्ये स्वाईन फ्ल्यूची धास्ती वाढली आहे. गेल्या दोन दिवसात सलग दोन जणांचा मृत्यू या स्वाईन फ्ल्यूमुळे झाला आहे. तर गेल्या अकरा दिवसांत हा स्वाईन फ्ल्यू चा चौथा मृत्यू आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. आकुर्डीच्या ५६ वर्षीय पुरुषाचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b184cdad-a85f-11e8-8fd3-c1da9d5e8373′]

ऑगस्ट महिन्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढला असून गेल्या अकरा दिवसात चार जणांचा मृत्यू स्वाईन फ्ल्यूमुळे झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्यामुळे पुढील उपचार घेता येतात. आकुर्डी येथील ५६ वर्षीय पुरुषांवर पिंपरी-चिंचवड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने १७ ऑगस्ट रोजी अतिदक्षता विभागात हलवण्यात आले परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

२०१७ मध्ये जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत ६१ जणांचा स्वाइन फ्ल्यू ने बळी घेतला होता. सद्य स्थितीला ऐकून ८ जण स्वाइन फ्ल्यू ने बाधित रुग्ण आढळले आहेत त्याच्यांवर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. परंतु गेल्या काही दिवसात स्वाईन फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढला असून महानगर पालिका प्रशासन यावर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरत आहेत.

इतर बातम्या

ठेवीदारांना कोट्यावधीचा चुना लावणाऱ्या दिलीप आपेटला पुण्यातून अटक

कोल्हापूरातील उडान फाऊंडेशनची केरळला मदत