‘वर्दी’च स्वप्न पूर्ण झालं पण तिला जीवनाशी ‘हार’ पत्करावी लागली, मुलीचा ‘चेहरा’ पाहून वडिल ‘अस्वस्थ’

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील बरेली येथून दुर्दैवी घटना समोर आली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगत भरतीसाठी असलेल्या तरुणीचा चाचणी घेण्यात येणाऱ्या मैदानावरच मृत्यू झाला. आंशिक असे या तरुणीचे नाव आहे. आपल्या एकुलत्या एक मुलीला पोलिसांत भरती करण्यासाठी अंशिकाचे वडील रामवीर स्वत: बरेली येथे तिला घेऊन पोहोचले होते. आंशिका पीएसी मैदानावर धावत होती आणि तिचे वडील बाहेर उभे राहत तिच्या यशासाठी प्रार्थना करत होते.

तेथे तिला १४ मिनिटांत सहा राउंड पूर्ण करत २.४ किमी शर्यत पूर्ण करायची होती. अंशिकाने १३ मिनिटे आणि काही सेकंदात ही पूर्ण केली. परंतु धावत असतानाच ती ट्रॅकवर बेशुद्ध होत पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती मिळताच एसपी ग्रामीण संसारसिंग, एसपी सिटी, पीएसी कमांडंट विकास कुमार वैद्य, कमलेश बहादूर व अन्य अधिकारीही दाखल झाले. त्यांनी बाहेर उभे असलेले अंशिकाचे वडील रामवीर, भाऊ विनय आणि त्याची बहीण यांना संबंधित माहिती देत अंशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, अंशिकाचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला धक्का बसला आहे. पोस्टमार्टममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने अंशिकाचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.

अंशिकाच्या मृत्यूमुळे फजलपूर परिसरात शोककळा पसरली आहे. आंशिकाची इच्छा होती की, तिची यूपी पोलिसात भरती व्हावी, आणि वडिलांना आधार द्यावा. रामवीर हे शेतकरी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी डॉली, मुले हिमांशु आणि मुकुल असा परिवार आहे. अंशिकाने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते.

दरम्यान, १९९९ मध्ये जन्मलेल्या अंशिकाला कोणत्याही परिस्थिती पोलिस भरती चाचणी पास करायची होती. ती रोज धावण्याचा सराव करत होती. पोलिस भरतीत सामान्य वर्गाचे जास्तीत जास्त वय २१ वर्षे असल्याचे कारण होते. अंशिका २१ वर्षांची होण्यास काही महिने शिल्लक होते. मात्र, स्वप्न पूर्ण होण्याच्या आत नियतीने घाट घातला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/