आठ दिवसात उत्तर द्या, राम कदम यांना महिला आयोगाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

दहीहंडी उत्सवात भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची दखल अखेर महिला आयोगाने घेतली आहे. राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करून आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश राम कदम यांना दिले आहेत. आमदार कदम यांनी महिलांबाबत वक्तव्य करताना काळजी घ्यायला हवी होती. आता स्युमोटो दाखल केल्यानंतर कदम यांनी या प्रकरणात ८ दिवसात उत्तर द्यावे,  असे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत.

[amazon_link asins=’B0757K3MSX,B07DYFX2C8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c57b71a-b188-11e8-bc3f-e7a8b15444b6′]

राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त आणि बेताल वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आता राज्य महिला आयोगाने त्यांना आठ दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिल्याने राम कदम अडचणीत येणार आहेत.

पिंपरी : राम कदम यांच्या बेताल वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीच्यावतीने ‘जोडे मारो’ आंदोलन

 

कदम यांनी व्यक्त केली दिलगिरी

राम कदम यांनी अखेर वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांचा एक मराठीतला आणि एक हिंदीतला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हिंदीतल्या व्हिडिओत त्यांनी तमाम माता भगिनींचा सन्मान करतो आहे असे म्हणत क्षमा मागितली आहे. तर मराठीतल्या व्हिडिओत दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र आपल्या वक्तव्यात माफी हा शब्द त्यांनी कुठेही येऊ दिलेला नाही.

माझे वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आले. मात्र याबाबत कोणतीही सफाई किंवा स्पष्टीकरण न देता मी दिलगिरी व्यक्त करतो असे राम कदम यांनी म्हटले आहे. तर हिंदीमध्ये त्यांनी क्षमा या शब्दाचा वापर केला आहे. मात्र जे बोललो ती माझी चूक आहे मला माफ करा असे राम कदम या दोन्ही व्हिडिओंमध्ये एकदाही म्हटलेले नाहीत.

तो मोबाइल नंबर अनअ‍ॅव्हेलेबल

 

राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलेला मोबाइल क्रमांक आता अनअ‍ॅव्हेलेबल आहे. त्यामुळे त्यांनी बंद ठेवला आहे हे उघड आहे. त्यांनी जाहीरपणे सांगितलेला मोबाइल क्रमांक डायल केला असता, आपण डायल करत असलेला मोबाइल क्रमांक सध्या उपलब्ध नाही, चालू व्हॉइस टेरिफनुसार व्हॉइस मेसेज पाठवू शकता असा संदेश येतो. कदम यांनी ९८३३१५१९१२ हा मोबाइल क्रमांक जाहीरपणे सांगितला होता. कदम यांची खरडपट्टी काढण्यासाठी राज्यभरातून त्यावर फोन येऊ लागले. त्यानंतर हा मोबाइल बंद ठेवण्यात आला आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.
 जाहीरात