Anti Aging Skin Care Tips | चेहरा वयस्कर वाटतोय का?; सुरकुत्या घालवण्यासाठी ‘हे’ 5 उपाय करा होईल फायदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Anti Aging Skin Care Tips | आजच्या युगात प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा आहे. पण, निसर्गाचा एक नियमही आहे की, आपले वय जसजसे वाढेल तसेच आपले सौंदर्यही बदलू लागते. आपल्याला माहित आहे की चेहऱ्याचे सौंदर्य दर्शविण्यास आपली त्वचा मोठी भूमिका बजावते (Skin Care). दरम्यान, अकाली वृद्धत्व (Premature Aging) ही नवीन समस्या नाही. सध्या युगात आपण अशा अनेक चुका करतो, ज्याचा फटका आपल्या सौंदर्याला (Anti Aging Skin Care Tips) सहन करावा लागतो.

 

फेशियल, महागड्या क्रीम्स अथवा महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्सने त्या स्वतःला तरुण आणि सुंदर ठेवू शकतात, असं बहुतेक महिलांना वाटत असते. या गोष्टींमुळे तुमची त्वचा निरोगी होऊ शकते, पम त्याचा प्रभाव अधिक काळ टिकत नाही. सुंदर दिसणे आणि त्वचा मेंटेन ठेवणे यात खूप फरक आहे. आपण इच्छित असल्यास, मेकअपच्या मदतीने आपण काही काळ सुंदर दिसू शकतो, मात्र, नैसर्गिकरित्या सुंदर (Naturally Beautiful Tips) ठेवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते. त्यामुळे अनेक उपाय करणे आवश्यक आहे. (Anti Aging Skin Care Tips)

 

काय समस्या उद्भवतात (What Problems Arise) –
सध्याच्या धावपळीच्या युगात कमी वयातच बारीक रेषा, सुरकुत्या, वृद्धत्वाची लक्षणे (Thin Lines, Wrinkles, Signs Of Aging) दिसू लागत आहेत. हे दुर करण्यासाठी अशा गोष्टींचा स्किन केअर रूटीनमध्ये समावेश करणे महत्वाचे आहे, ज्यामुळे ते रोखण्यात मदत होईल. अलीकडेच, तज्ञांनी याबद्दल काही टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्सचा वापर करून तुम्ही त्वचा दीर्घकाळ चांगली ठेवू शकता.

सनस्क्रीन (Sunscreen) –
वयानुसार चेहऱ्यावर वृद्धत्व दिसणे स्वाभाविक आहे, पण वेळेपूर्वी दिसणारी लक्षणे कमी होऊ शकतात. यासाठी नेहमी चेहऱ्यावर एसपीएफ सनस्क्रीन लावण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बाहेर असाल अथवा आत, ते नेहमी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावणे फार महत्वाचे आहे. खरं तर, अतिनील किरण इलॅस्टिन आणि कोलेजन तंतूंना नुकसान करतात, जे त्वचेला लवचिकता प्रदान करतात. कोलोजनच्या अभावामुळे सुरकुत्या, पिगमेंटेशन, सन टॅन (Wrinkles, Pigmentation, Sun Tan) अशा समस्या उद्भवू लागतात. असं तज्ज्ञांनी सांगितले आहे.

 

Vitamin C चा समावेश (Contains Vitamin C) –
अँटिऑक्सिडंट घटक त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करत असतात. सुरकुत्यांव्यतिरिक्त, ते सूज कमी करण्यासही मदत करतात. प्रदूषणाने होणारं त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी, सकाळी व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स (Vitamin C And Antioxidants) असलेले उत्पादने वापरणे महत्वाचे आहे.

 

मॉईश्चर (Moisture) –
महत्त्वाचे म्हणजे त्वचेला मॉइश्चरायझिंग ठेवा. जे ते टाळतात, त्यांना यातून होणारे नुकसान आगामी काही दिवसांत कळू शकेल. म्हणून फक्त वेळेआधीच वृद्धत्व येत नाही तर त्वचेच्या इतर समस्या देखील जाणवू लागतात.

 

ह्यालूोरोनिक एसिडचा वापर (Use Of Hyaluronic Acid) –
दरम्यान, आपले वय वाढते तसतसे त्वचेला अतिरिक्त बूस्टची आवश्यकता असते आणि यामुळे कोलेजनही वाढते.
यासाठी ह्यालूोरोनिक ऍसिड वापरणे फायदेशीर ठरू शकते.
हे त्वचा लवचिक ठेवते आणि सुरकुत्यांसारखी अकाली वृद्धत्वाची चिन्हे टाळते. त्वचेची लवचिकता वाढवण्यातही ते उपयुक्त ठरू शकते.

अतिरिक्त चकाकीसाठी काय कराल? (What To Do For Extra Shine) –
आजकाल चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या थेरपी उपलब्ध आहेत ज्यांची तुम्ही मदत घेऊ शकता.
त्वचा तरुण आणि चमकदार बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
हे तुमच्या त्वचेला आराम देते, चेहऱ्याला नैसर्गिक चमक देते. असं सांगितलं आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Anti Aging Skin Care Tips | anti aging skin care tips skin doctor shares anti ageing tips for glowing skin

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Drinking Tea In The Morning | सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा पिता का?; आरोग्याचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या

 

Excessive Consumption Of Raisins Is Harmful | मनुके आवडीने खाताय?; अति सेवन आरोग्यास ठरेल नुकसान, जाणून घ्या

 

Health Care Tips | जेवल्यानंतर ‘ही’ चुक करत आहात का?; आरोग्यावर होईल विपरीत परिणाम, जाणून घ्या