CAA आंदोलना दरम्यान ISI नं ‘अ‍ॅक्टीव्ह’ केलं होतं ‘अंडरवर्ल्ड’, भारतात ‘दंगल’ घडविण्याचा होता ‘कट’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध सुरू असताना, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतात अस्थिरता निर्माण करण्याची तयारी करत होती, अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यासाठी आयएसआयने राईट विंगशी संबंधित नेत्यांवर हल्ल्याचा कट रचला होता.

आयएसआयने अंडरवर्ल्ड नेटवर्क केले सक्रिय
गुप्तचर यंत्रणांच्या अहवालात असेही समोर आले आहे की, आयएसआयनेही भारतात दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता आणि त्यासाठी अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारांचे जाळे सक्रिय केले होते. आयएसआय दहशतवादी हल्ले करून भारतात दंगल पसरवण्याचा प्रयत्न करीत होता. या अहवालानुसार यावर्षी 13 फेब्रुवारी रोजी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने आपले माऊथ पीस म्हणवणाऱ्या अल-नाबाच्या माध्यमातून भारतीय गुप्तचर यंत्रणांवर तसेच संघ परिवारवर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

पाकिस्तान भारतातील वातावरण खराब करण्याच्या प्रयत्नात
अहवालानुसार, ग्लोबल टेररिस्ट ग्रुप जिथे जगभरात आपल्या दहशतवादी संघटना आणि फॉलोवरकडून दहशतवादी हल्ले, आयईडी हल्ले, लोन वुल्फ किंवा स्फोटकांनी भरलेल्या वाहनांच्या माध्यमातून हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याचबरोबर पाकिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना भारतातील जातीय सलोख्याचे वातावरण खराब करण्यासाठी दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहेत.

डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत भारतात करण्यात आली निदर्शने
2019 मध्ये डिसेंबर ते 2020 च्या फेब्रुवारी मार्च या कालावधीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी याविरूद्ध व्यापक निदर्शने झाली. मुस्लिम संघटना, नागरी संस्था यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास विरोध दर्शविला आणि ते मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे म्हटले होते.