CAA विरोधी हे ‘कोरोना’ सारखे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी सांगितलं

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नेहमी वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांनी आता नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या लोकांची तुलना कोरोना व्हायरसशी केली आहे.

कोरोना व्हायरस हा मानवतेचा शत्रू आहे. हा माणसातूनच पसरतोय. हा स्वार्थासाठी जाळपोळ आणि तोडफोड करून मानवी मूल्यांवर हल्ला करतोय. त्यांची अनैतिक कृत्ये रोखली की ते दुसरा चेहरा घेऊन उभे ठाकतात. कोरोना आणि होर्डिंगवर असलेल्या हिंसाचार करणाऱ्यांचे चेहरे हे दोन्ही समाजासाठी घातक आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

सीएएविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्यांचे होर्डिंग लावल्याने ते होर्डिंग काढण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. यावरून योगी यांनी हिंसक आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना लक्ष केलं. होर्डिंगवरचे चेहरे बघा. स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्थेच्या नावाने मानवतेवर धडे देणारे बघा काय करत आहे. त्यांचं खरं काम बघितलं तर ते मानवतेचे सर्वात मोठे शत्रू असल्याचं समोर येत आहे. जनतेने खऱ्या शत्रुंना ओळखावं. यामुळे अशा व्हायरस पासून बचाव करता येईल, असंही ते म्हणाले.

होर्डिंग लावल्याने कोणाचीही प्रतिमा मलीन झाली नसून, हिंसा करणारे चेहरे मीडियातून सर्वांपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तर तेच लोक समाजासाठी धोकादायक बनले आहे. यांच्याबाबत ठोस पुरावे सुद्धा आहे. सीएएविरोधी हिंसाचारात पोलिसांच्या गोळीबारात कोणीही ठार झालं नाही. ते आपल्याच गोळीने ठार झाले असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.