Coronavirus : कोलकातामध्ये विकली जातेय ‘अँटी-कोरोना मिठाई’, ‘हा’ संदेश देण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात कोरोना विषाणूचा थैमान घालत आहे. सर्व देश कोरोना विषाणूवर उपचार शोधण्यात गुंतले आहेत. त्याचबरोबर, भारतातही कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीने ‘अँटी कोरोना स्वीट’ तयार केले आहे. पश्चिम बंगालमधील जादवपूरच्या हिंदुस्तान स्वीट्मध्ये ही ‘अँटी कोरोना स्वीट’ नावाची मिठाई विकली जात आहे.
कोलकाता में बिक रही 'एंटी-कोरोना मिठाई, ये संदेश देने की कोशिशप्रमुख मिठाईंसाठी प्रसिद्ध असलेल्या या हिंदुस्थान स्वीट्समध्ये विषाणूचा संदेश म्हणून ही मिठाई केली आहे. खास गोष्ट म्हणजे ही मिठाई कोरोना विषाणूचे जैविक वर्णन आणि आकारात तयार केली गेली आहे. जेणेकरून या मिठाईद्वारे लोकांमध्ये जनजागृती होऊ शकेल. ‘आम्ही कोरोना पचवू शकतो’, असा संदेशही या मिठाईसोबतच लोकांना देण्यात येत आहे. याबाबत हिंदुस्तान स्वीट्सचे मालक रवींद्र कुमार पाल यांनी सांगितले कि, ‘आम्ही’ अँटी-कोरोना स्वीट’ बनविला आहे. कोरोनाव्हायरसबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आम्ही ही मिठाई बनविली आहे. लोक घाबरू नये अशी माझी इच्छा आहे. आमचा नारा आहे ‘आम्ही कोरोनाला पचवू आणि आम्ही याला घाबरणार नाही’.

रवींद्र कुमार पुढे म्हणाले कि, ‘आम्ही रवींद्रनाथ टागोरांच्या शब्दांचा उल्लेख केला आहे-‘ नहीं नहीं होए, होबे होबे जोए, कोरोना होब पराजोय.’आम्हाला खात्री आहे की आपण ही लढाई जिंकू. मी प्रत्येक ग्राहकांला या मिठाईची चव चाखायला देईल. आम्ही केवळ मिठाईच दिली नाही, तर राज्य सरकारने लोकांना क्वारंटाईन ठेवण्यासाठी पाच मजली इमारत दिली आहे. राज्य सरकारच्या मदत निधीसाठी एक लाख रुपयांची देणगीही दिली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून पश्चिम बंगाल सरकारने लॉकआऊट कालावधीत मिठाईची दुकाने दिवसाचे चार तास खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे.