Anti Corruption | महसूल विभागातील वरिष्ठ महिला अधिकार्‍यासह कोतवाल 1,00,000 ची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – परंडा तालुक्यातील (paranda) जेकटेवाडी येथील वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्याकडे वाळूचा व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी दरमहा हप्तारुपी एक लाख 10 हजार रुपयांची लाच घेताना भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर(
Sub-Divisional Officer Manisha Rashinkar) यांच्यासह कोतवाल विलास नरसिंग जानकर (Kotwal Jankar Vilas Narsingh) याला उस्मानाबाद (Osmanabad) लाचलुचपत विभागाने (Anti Corruption) रांगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी केली असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, महसूल विभागातील एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी जाळ्यात अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. Anti Corruption कारवाईमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय तेजीत सुरू असून अधिकारी यांना दरमहा लाखो रुपयांची लाच द्यावी लागते हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्यांच्या पाहुण्यांचा जेसीबी
आणि तीन ट्रॅक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी उपविभागीय अधिकारी
मनिषा राशीनकर व विलास जानकर यांनी दरमहा हप्तारुपी लाच मागितली होती.मात्र तक्रारदाराने ते
मान्य केले नाही. अखेर तडजोडी अंती ९० हजार आणि २० हजार देण्याचे ठरले त्यानुसार हे पैसे
स्वीकारले होते. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते, पोलीस निरीक्षक गौरिशंकर पाबळे,
अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांनी केली.

हे देखील वाचा

Tokyo Olympics 2020 | टोक्यो ऑलंपिकमध्ये पी. व्ही. सिंधुची विजयी घोडदौड

Pune Crime | पुणे कॅन्टोंमेंटचा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर ‘मोक्का’; रचला होता ‘बबलु गवळी’च्या खुनाचा कट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anti Corruption | acb arrested osmanabad bhum senior lady officer in revenue department red handed while receiving bribe

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update