Anti Corruption | 12 लाखाचं लाच प्रकरण ! 2 लाखाची लाच घेताना गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलमधील अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, पोलिस दलात खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Anti Corruption | अ‍ॅन्टिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामुळे मुंबई पोलिसांची (Mumbai Police) प्रतिमा डागाळली आहे. ही प्रतिमा पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून प्रयत्न केले जात असतानाच शुक्रवारी आणखी एक धक्का बसला. गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षातील (Crime Branch Property cell) सहायक पोलीस निरीक्षक नागेश पुराणिक (API Nagesh Puranik) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption) दोन लाखाची लाच (Accepting Bribe) घेताना अटक (Arrest) केली. पुराणिक याने चोरीच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी 12 लाखाची मागणी केली होती.

मालमत्ता कक्षाकडे बीएमडब्ल्यू (BMW) कार चोरी प्रकरण तपासासाठी आहे.
कार चोरी प्रकरणात महिलेचे पती आणि त्यांचा मित्र यांचा सहभाग आढळत होता.
या दोघांवर कारवाई न करण्यासाठी नागेश पुराणिक याने 12 लाखाच्या लाचेची मागणी कोली.
पती आणि त्यांच्या मित्राला कारवाईपासून दूर ठेवण्यासाठी महिलेने पुराणिक याला 4 लाख रुपये यापूर्वीच दिले.
उर्वरित आठ लाखासाठी पुराणिक याने महिलेकडे तगादा लावला होता.
एवढी रक्कम जमा करणे शक्य नसल्याने तडजोडीमध्ये चार लाख देण्याचे ठरले होते.

 

महिलेला तडजोडीत ठरलेली चार लाखाची रक्कम जमा करणे अशक्य होत असल्याने आणि पुराणिक पैशांसाठी तगादा लावत असल्याने तिने अँटी करप्शन ब्युरोकडे
(Anti Corruption) तक्रार केली. तकारीची पडताळणी केली असता पुराणिक याने पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने मालमत्ता कक्षाच्या भायखळा (Byculla office) येथील कार्यालयात सापळा (Anti Corruption Trap) रचला.
यावेळी तक्रारदार महिलेकडून दोन लाखांची लाच घेताना पुराणिक याला पकडण्यात आले.
पुराणिक विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title : Anti Corruption | 12 lakh bribery case! Officers in the property cell of the crime branch caught taking anti-corruption while accepting a bribe of Rs 2 lakh.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | महाराष्ट्राने नेहमीच राजकीय आणि सांस्कृतिक आदर्श प्रस्थापित केला – नितीन गडकरी

Gold Price Update | पुन्हा घसरले ‘सोने’, आता 27060 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

Driving License | खुशखबर ! जर मोबाइलमध्ये असेल डॉक्यूमेंट्सची कॉपी तर भरावे लागणार नाही चलान, जाणून घ्या नवीन नियम