Anti Corruption Trap | 8 हजाराची लाच घेणारा पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात, पुणे ग्रामीणमध्ये खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Trap | ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यास 8 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने Anti Corruption रंगेहात पकडले आहे. यामुळे पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस कर्मचारी दराडे असे ताब्यात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दराडे हे यवत पोलीस ठाण्यात (Yavat Police Station)
नेमणुकीस आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचून  कारवाई केली दरम्यान दराडे यांना 8 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. कारवाई सुरू असून, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हे देखील वाचा

Pune Corporation | सर्वोच्च न्यायालयाचा पुणे मनपाला दणका ! HCMTR प्रकल्प प्रकल्पाबाबत दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

Pune News | पुणे 4 वाजता लॉक झालंच पाहिजे, अन्यथा कडक कारवाई करा, अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना

Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार, राज्य सरकारकडून 3 सदस्यीय समिती स्थापन


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Anti Corruption | Anti Corruption trap on pune rural policeman while taking bribe of eight thousand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update