रात्री ११ वाजता ७ लाखाची मागणी करून १ लाखाची लाच घेणारे दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

खंडाळा येथे ट्रेलरचालकाकडून लाच घेणाऱ्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या उपनिरीक्षकावर पहाटे कारवाई करुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आपण २४ तास तत्पर असल्याचे दाखवून दिले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा देहुरोडला कारवाई करुन भूमापकासह त्याच्या वसुलीवाल्यावर कारवाई करण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b220ca46-cddd-11e8-bda1-457f08defbf1′]

जमिनीची मोजणी करुन त्याचा नकाशा न्यायालयात सादर करण्यासाठी ७ लाख रुपयांपैकी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली भूमी अभिलेखाचे भूकरमापक व खासगी व्यक्तीला सापळा रचून गुरुवारी रात्री उशिरा पकडले.

भूकरमापक संजय वामनराव शिंदे (वय ५०, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा) आणि खासगी व्यक्ती विकास सजेर्राव वाघमारे (वय ४२, रा. तळ्याचा माथा, देहुरोड)  यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांच्या जमिनीचा वाद न्यायालयात सुरु आहे. त्यासाठी न्यायालयाने जमिनीची मोजणी करुन त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी भूमी अभिलेखाच्या हवेली कार्यालयाकडे अर्ज केला होता. तक्रारदारांच्या जमिनीची मोजणी करुन त्याचा नकाशा न्यायालयात सादर करण्यासाठी भूकरमापक शिंदे यांनी ७ लाख रुपयांची मागणी केली. त्याची तक्रार त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ व ११ आॅक्टोंबरला पडताळणी केली. त्यात ७ लाख रुपयांपैकी पहिला हप्ता १ लाख रुपये देण्याचे ठरले.

[amazon_link asins=’B07DYSX1HP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bcde1e7f-cddd-11e8-8f84-53d098be6c6c’]

भूकरमापक संजय शिंदे यांच्यासाठी वसुलीचे काम विकास वाघमारे हा पहातो. संजय शिंदे यांनी विकास वाघमारे याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग इतक्या रात्री कारवाई करणार नाही, असे वाटून विकास वाघमारे याने तक्रारदार यांना रात्री देहुरोड येथील तळ्याचा माथा येथे आपल्या घरी पैसे आणून देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे व त्यांच्या सहकाऱ्यानी सापळा रचला. गुरुवारी रात्री पावणे नऊ वाजता वाघमारे याला तक्रारदार यांच्याकडून १ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई यशस्वी होताच दुसऱ्या पथकाने भूमापक संजय शिंदे यांना ताब्यात घेतले.

एअर इंडियाचे विमान सरंक्षक भिंतीला धडकले

देहुरोड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर संजय शिंदे यांच्या घरावर छापा घातला असून त्याच्याकडे बँक लॉकर तसेच मालमत्तेची कागदपत्रे सापडली असून पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे अधिक तपास करीत आहेत.