Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड! ACB चे अधिकारीही चक्रावले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | औरंगाबाद शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे (Temple Hall Work) बिल मंजूर (Bill Approved) करण्यसाठी बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याने (Branch Engineer) सव्वा लाखाची लाच मागितली (Demand Bribe) होती. तडजोडीत 40 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad) शाखा अभियंता संजय राजाराम पाटील Sanjay Rajaram Patil (वय-52 रा. डी.1, गुरुगणेश अपार्टमेंट, उल्कानगरी) याला रंगेहाथ पकडले. यानंतर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.16) पाटीलच्या घराची आणि बँक लॉकरची (Bank Locker) झडती घेतली त्यावेळी कोट्यावधीचे घबाड औरंगाबाद एसीबीच्या (Aurangabad ACB) हाती लागले आहे. इतकं मोठं घबाड सापल्यानंतर अधिकारी देखील चक्रावून गेले.

 

औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad) अधिकाऱ्यांना संजय पाटील याच्या बँक लॉकर आणि घरात तब्बल 85.5 तोळे सोने (Gold) आणि 27 लाख 65 हजार 683 रोख रक्कम (Cash) सापडली. संजय पाटील हा शहरातील पद्मपुरा भागातील सा.बां. विभागाच्या (Construction Department) कार्यालयात वर्ग 2 चा अधिकारी आहे. त्याने मुकुंदवाडीतील मारोती मंदिराच्या सभागृह बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी 1 लाख 25 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीत 1 लाख रुपये देण्याचे ठरले होते. औरंगाबाद एसीबीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर शनिवारी (दि.12) उल्कानगरी येथील रिद्धी-सिद्धी हॉल समोरील रस्त्यावरच ठरलेल्या लाचेचा पहिला हप्ता 40 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.

याबाबत जवाहरनगर पोलीस ठाण्यात (Jawaharnagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. यानंतर पाटीलच्या घराची झडती घेण्यात आली. यामध्ये 1 ला 61 हजार रुपये रोख आणि 183 ग्रॅम म्हणजे 18 तोळे 3 ग्रॅम सोने सापडले. त्याचवेळी दशमेश नगर येथील एसबीआय बँकेतील (SBI Bank) लॉकरच्या चाव्याही सापडल्या. एसीबीच्या पथकाने बुधवारी लॉकर उघडले. त्यामध्ये 672 ग्रॅम म्हणजे 67 तोळे सोने आणि 26 लाख 4 हजार 500 रुपये रोख रक्कम सापडली.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे (SP Dr. Rahul Khade), अपर पोलीस अधीक्षक विशाल खांडे (Addl SP Vishal Khande), उपअधीक्षक मारुती पंडीत (Deputy Superintendent Maruti Pandit) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे (Deputy Superintendent of Police Gorakhnath Gangurde), पोलीस निरीक्षक दीपाली निकम (Police Inspector Deepali Nikam) यांच्या पथकाने केली.

 

आरोपीला एका दिवसात जामीन
लाचेच्या प्रकरणात गुन्हा दाखल करुन सचिन पाटील याला अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर एका दिवसात आरोपी पाटील याला जामीन मंजूर (Bail Granted) झाल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

सचिन पाटीलकडं कोट्यवधीची संपत्ती
एसीबीच्या पथकाला पाटील याच्याकडे सापडलेले सोने आणि रोख रक्कम ही एकूण संपत्ती पाऊण कोटीपर्यंत आहे.
वर्ग दोनच्या अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती आढळल्याने बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.
पाटील याच्याकडे कोट्यावधी रुपयांची स्थावर मालमत्ता (Real Estate) असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही मालमत्ता प्लॉट, फ्लॅट, जमिन आणि बंगला यात गुंतवली असण्याची शक्यता एसीबीच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
पाटील विरोधात आर्थिक मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
त्याच्या स्थावर मालमत्तेची खुली चौकशी होणार असल्याचे एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी लॉकर असण्याची शक्यता
एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी केवळ एक लॉकर उघडण्यात आले.
यामध्ये कोट्यवधींचं घबाड सापडले आहे. आणखी किती लॉकरमध्ये पैसे, दागिने आहेत? किती बँकेत खाती आहेत?
घरात किती रोकड लपवून ठेवली आहे आणि कुठे कुठे स्थावर मालमत्ता घेतली आहे याची चौकशी सुरु आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | 85 ounces of gold 27 lakh cash lakhs of rupees in the locker of corrupt engineer sanjay patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 229 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Holi Precautions | होळी खेळताना ‘या’ 7 चुका करू नका नाहीतर…

 

Gauahar Khan On The Kashmir Files | अभिनेत्री गौहर खानने ‘द काश्मिर फाइल्स’वर केली ‘हे’ वक्तव्य, म्हणाली…