Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | 5 हजाराचा हप्ता घेणारा पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळयात

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad |वाळुंज हद्दीतून (Waluj MIDC Aurangabad) वाळू वाहतूक करण्यासाठी व वाहनावर कारवाई न करण्यासाठी दर महिन्याला ५ हजार रुपये हप्त्याची मागणी करुन ५ हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad) सापळा रचून एका पोलीस निरीक्षकाला अटक केली आहे.

 

जनार्दन सुभाष साळुंखे Janardan Subhash Salunkhe (वय ४२) असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. औरंगाबाद (Aurangabad Police) शहरातील वाहतूक शाखेच्या (Aurangabad City Traffic Police) वाळुंज येथे त्यांची नियुक्ती होती.

 

याप्रकरणी एका २६ वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांच्या मालकीच्या हायवाने वाळूची वाहतूक वाळुंज हद्दीतून करु देण्यासाठी
व हायवा ट्रकवर कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक जनार्दन साळुंखे याने दरमहा ५ हजार रुपये हप्ता मागितला होता.
या तक्रारीची पडताळणी शुक्रवारी करण्यात आली. त्याची पडताळणी  करण्यात आली.
त्यात त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे (SP Dr Rahul Khade),
अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe) , उपअधीक्षक रुपचंद वाघमारे (DySP Rupchand Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत व त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारताना जनार्दन साळुंखे याला पकडण्यात आले.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | ACB Aurangabad arrested police inspector janardan subhash salunkhe while taking bribe of 5000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Corporation Employees | पुणे महापालिकेतील 600 पेक्षा जास्त कर्मचारी केले जाणार कमी

SSC-HSC Board Exams | 10 वी, 12वीच्या विद्यांर्थ्यांसाठी खुशखबर ! आता परीक्षेसाठी उपलब्ध होणार Question Bank; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Modi Government | केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार