Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांसह पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | शेतजमीन वारस नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांसह पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. याप्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील मंडल अधिकारी संतोष सांगडे (Santosh Sangade) आणि पंटर मुबारक उस्मान मुजावर (Mubarak Usman Mujawar) (रा. विशाळगड, ता. शाहूवाडी) या दोघांविरोधात शाहुवाडी पोलीस ठाण्यात (Shahuwadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादी व्यक्तीने शेत जमीन वारस नोंदीसाठी मंडलाधिकारी संतोष सांगडे यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पंटर मुबारक मुजावर यांच्यामार्फत मंडळ अधिकारी यांनी 5 हजार रुपयांची मागणी केल्याचे, चौकशीत निष्पन्न झाले आहे. यावरुन सांगडेसह दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यामधील पंटर मुबारक मुजावर यास अटक (Arrested) करण्यात आली आहे. तसेच, संशयित संतोष सांगडे याला लवकर अटक करण्यात येईल, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत (DySP Adinath Budhwant) यांनी दिली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur Mandal Officer shahuwadi bribe case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा