
Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 2 हजाराच्या लाचप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबलसह पोलीस पाटलावर FIR; कोल्हापूर पोलीस दलात मोठी खळबळ
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | मागील महिन्यात कोल्हापूरात दहा लाखांच्या लाचप्रकरणी चक्क स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील दोन पोलिसांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून (Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur) आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयीन वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी चक्क 2 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी इचलकरंजीच्या शहापूर पोलीस ठाण्यातील (Shahapur Police Station) पोलीस कॉन्स्टेबल आणि एका पोलीस पाटलाविरोधात (Police Patil) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पाटील जगदीश भूपाल संकपाळ (Jagdish Bhupal Sankapal) (रा. यड्राव, ता. शिरोळ) याला पोलिसांनी अटक (Arrested) केले आहे. तर पोलीस कॉन्स्टेबल आसिफ नसरूद्दिन सिराज भाई (Asif Nasruddin Siraj Bhai) (वय 40, रा. यड्राव) हा पसार आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात (Kolhapur Police Force) मोठी खळबळ उडाली आहे. (Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur)
याबाबत माहिती अशी की, यड्राव परिसरातील तक्रारदार व्यक्तीच्या आत्तीच्या नावे कोर्टाचे वॉरंट निघाले होते. याप्रकरणात संबंधित महिलेवर अटकेची कारवाई शक्य होती. परंतु, ही कारवाई टाळण्यासाठी आणि तपासात मदत करण्याचे आमिष दाखवून, कॉन्स्टेबल आसिफ सिराजभाई आणि पोलीस पाटील जगदीश संकपाळ यांनी तक्रारदार व्यक्तीकडून 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
दरम्यान, तडजोड करून 1500 रुपयांवर डिल झाली होती.
यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Kolhapur) तक्रार केली होती.
यानूसार आज (शुक्रवारी) सकाळी संबंधित व्यक्तीकडून रक्कम स्वीकारताना पथकाने पोलीस पाटील संकपाळ याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान कॉन्स्टेबल सिराज भाई पसार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत (DySP Adinath Budhwant) आणि पथकाने केली आहे.
Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | Kolhapur police and police patil arrested for taking bribe Shahapur Police Station
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Avneet Kaur New Car | अवघ्या 20 वर्षाच्या अवनीत कौरनं खरेदी केली चक्क 2 कोटीची Range Rover !