Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 15 हजाराची लाच घेताना ‘महावितरण’चा सहाय्यक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – केलेल्या कामाची बिले मंजूर करण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी (Accepting Bribe) करुन ती स्विकारताना महावितरण (MSEDCL) कंपनीच्या सहाय्यक अभियंत्याला (Assistant Engineer) कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur) रंगेहात पकडले. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur) ही कारवाई ताराबाई पार्क (Tarabai Park) येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात (Head Office) केली. धर्मराज विलास काशीदकर Dharmaraj Vilas Kashidkar (वय-40) असे या अभियंत्याचे नाव आहे. या कारवाईमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

 

तक्रारदाराने महावितरण ग्रामीण विभाग 2 अंतर्गत ट्रान्सफार्मर लोडिंग (Transformer Loading) अनलोडिंगची (Unloading) कामे केली होती. या कामाची बिले मंजूर (Bills Approved) करण्यासाठी ते धर्मराज काशीदकर यांच्याकडे गेले होते. यावेळी काशीदकर याने तक्रारदाराकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार याने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur) तक्रार केली. तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यानंतर कोल्हापूर एसीबीने (Kolhapur ACB) आज (बुधवार) ताराबाई पार्क येथील महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात सापळा रचून आरोपी धर्मराज काशीदकर याला तक्रारदार यांच्याकडून 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. (Kolhapur Bribe Case)

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (SP Rajesh Bansode), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा (Addl SP Suhas Nadgauda),
पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत (Deputy Superintendent of Police Adinath Budhwant)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumbhar), सहायक फौजदार संजीव बंबर्गेकर,
पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, कॉन्स्टेबल मयूर देसाई, रुपेश माने यांनी केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | MSEDCL assistant engineer Dharmaraj Vilas Kashidkar caught while accepting bribe of Rs 15,000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

V. Muraleedharan | केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी घेतला केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

 

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला रुग्ण सहाय्यता कक्ष झाला हायटेक; रुग्णांची सर्व हिस्ट्री समजणार एका क्लिकवर; रुग्णांना जलद गतीने मिळणार मदत

 

Devendra Fadnavis | ‘अजित पवारांच्या शब्दाला कोणतीही किंमत राहिली नाही’ – देवेंद्र फडणवीस (Video)