Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 लाखांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी अटकेत; कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) गारगोटी येथील ग्रामविकास अधिकारी (Village Development Officer) तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur) जाळ्यात सापडला आहे. बांधलेली नवीन कमर्शियल इमारत व बंगला याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये दफ्तरी करण्यासाठी 5 लाखांची लाच स्वीकारताना त्याला एसीबी पथकाने रंगेहात पकडले (Arrested) आहे. अमृत गणपती देसाई (Amrit Ganpati Desai) (वय, 55, मुळ रा. पेरणोली, ता. आजरा, सध्या रा. अयोध्या नगर, गडहिंग्लज, कोल्हापूर) असं या लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, फिर्यादीने गारगोटीत नवीन कमर्शियल इमारत आणि बंगला बांधला आहे.
याची नोंद ग्रामपंचायतमध्ये दफ्तरी करणेसाठी त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्रे दिली होती.
या कामासाठी ग्रामविकास अधिकारी अमृत देसाई यांनी तक्रारदाराकडे वीस लाख रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तडजोडी अंती 14 लाख रुपये देण्याचे ठरले होते.

 

दरम्यान, यानंतर यामधील पाच लाखाचा पहिला हप्ता स्विकारताना ग्रामविकास अधिकारी देसाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) रंगेहात अटक (Arrested) करण्यात आले आहे.
दरम्यान, सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नितीन कुंभार (Police Inspector Nitin Kumbhar),
पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद पोरे (Police Head Constable Sharad Pore), पोलीस नाईक विकास माने (Vikas Mane),
सुनील घोसाळकर (Sunil Ghosalkar), रुपेश माने (Rupesh Mane) यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | village development officer arrested while accepting bribe of rs 5 lakh in gargoti in bhudargad taluka kolhapur district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा