Anti Corruption Bureau (ACB) Latur | गुन्ह्यातील मुख्य आरोपीकडून लाच घेणारा पोलीस हवालदारच अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Latur | कायद्याच्या रक्षणासाठी पोलीस आहेत मात्र काहीवेळा पोलिससुद्धा काही रूपयांमुळे आपलं कर्तव्य विसरतात. मात्र अशा पोलिसांमुळे संपुर्ण पोलीस खात्याची (Maharashtra Police) बदनामी होते. अशाच प्रकारे लातूरमध्ये (Latur) एका भ्रष्ट पोलीस हवालदाराला लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Latur) अटक केली आहे. बिट अंमलदार राजेंद्र लामतुरे (Rajendra Lamture) असं अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

 

औसा पोलीस ठाण्याच्या (Ausa Police Station) हद्दीत ही घटना घडली आहे. औसा पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यामधील त्या व्यक्तीची आरोपी म्हणून नोंद होती. मात्र आपण निर्दोष असून माझं गुन्ह्यातील नाव वगळण्यात यावं, अशी विनंती आरोपी अलीम बागवान (Aleem Bagwan) याने केली. त्यावेळी पोलीस हवालदाराने त्याला पाच हजार रूपये मागितले.

अलीम बागवानवर औसा पोलीस स्टेशनमध्ये कलम 294, 323, 506 अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. हवालदार आणि अलीम बागवान यांच्यात बरीच तडजोड झाली आणि अखेर 3 हजार रूपये देण्याचं ठरलं. मात्र यानंतर अलीम बागवानने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलिसाची तक्रार केली. त्यानंतर एसीबी अधिकाऱ्यांनी तक्रारदार बागवान यांना सांगून सापळा रचला.

 

दरम्यान, ठरवल्याप्रमाणे अलीम बागवान पैसे देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तीन हजार रूपये पोलिसाला दिले.
तेवढ्यात पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली.
बिट अंमलदार राजेंद्र लामतुरे यांना रंगेहाथ पकडले.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Latur | acb arrests police constable for demanding bribe from accused in latur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा