Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | मटक्याच्या केसमध्ये कारवाई न करण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना API निंबाळकर आणि महमद अली अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Mumbai| मटक्याच्या गुन्ह्यामध्ये (Mataka Case) कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागून मध्यस्थामार्फत १८ हजार रुपयांची लाख घेताना सहायक पोलीस निरीक्षकासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) सापळा रचून पकडले. सहायक पोलीस निरीक्षक संजीव होनाजी निंबाळकर API Sanjeev Honaji Nimbalkar (वय ५०) आणि महमद अली वली मनसुरी Muhammad Ali Wali Mansuri (वय ४१) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संजीव निंबाळकर हा डोंगरी पोलीस ठाण्यात (Dongri Police Station) नेमणुकीला आहे.

डोंगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबाळकर व त्याच्या सहकार्‍यांनी एक मटक्याच्या अड्ड्यावर छापा घातला होता. फिर्यादीच्या भावाकडे मटक्याची चिठ्ठी सापडल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले होते. सहायक निरीक्षक निंबाळकर याने मध्यस्थामार्फत फिर्यादी यांना संपर्क साधला. त्यांच्यावर कारवाई न करण्याकरीता २० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) तक्रार आल्यावर त्यांनी पडताळणी केली. पडताळणीमध्ये निंबाळकर याने मध्यस्थामार्फत लाच मागितल्याने निष्पन्न झाले. त्यावरुन डोंगरी पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. फिर्यादीकडून तडजोडीअंती १८ हजार रुपयांची रक्कम मध्यस्थामार्फत स्वीकारताना पकडण्यात आले.

Web Title : Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | API Sanjeev Honaji Nimbalkar and
Mohammad Ali Wali Mansuri arrested while taking bribe Dongri Police Station Mataka Case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या