Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | महिला वरिष्ठ लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शासकीय निवासस्थान (Government House) बदलण्यासाठी लागणारे शिफारसपत्र (Recommendation Letter) अंधेरी (Andheri) येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पाठवण्यासाठी अर्जदार यांच्याकडून 10 हजार रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) उपअभियंता कार्यालयातील (Deputy Engineer Office) वरिष्ठ लिपिक प्रज्ञा भोसले (Senior Clerk Pragya Bhosle) यांना रंगेहाथ पकडले. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) ही कारवाई वांद्रे येथील उपअभियंता कार्यालयात केली.

 

मनोज (नाव बदलले आहे) हे मागील 15 वर्षापासून वांद्रे (Bandra) येथील शासकीय निवासस्थानात राहत आहेत. त्यांनी निवासस्थान बदलून मिळावे यासाठी प्रज्ञा भोसले या कार्यरत असलेल्या कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी निवासस्थान बदलून मिळणेबाबत पाठपुरावा केला. त्यावेळी भोसले यांनी शासकीय निवासस्थान बदलून देण्याकरिता लागणारे शिफारसपत्र अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात पाठवावे लागेल, यासाठी 10 हजार रुपये लाचेची मागणी (Demand Bribe) केली.

 

अर्जदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई एसीबीने (Mumbai ACB) पडताळणी केली. त्यावेळी प्रज्ञा भोसले यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी (दि.2) पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 10 हजार रुपये लाच स्विकारताना भोसले यांना रंगेहाथ पकडण्यात आले. (Bribe Case)

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | demanding bribe senior clerk pradnya bhosale ACB Bribe Case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा