Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | ‘तो’ जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण? ED अधिकारी असल्याचे सांगून 59 कोटी गोळा करणाऱ्यावर ACB कडून FIR, संजय राऊतांनी केले होते आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजपचे (BJP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि ईडीवर गंभीर आरोप केले होते. अखेर या प्रकरणी संजय राऊत यांनी आरोप केलेल्या जितेंद्र चंद्रलाल नवलानी Jitendra Chandralal Navlani (रा. कुलाबा कजवे, कुलाबा) याच्या विरोधात मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. 59 कोटी रुपयांचा अपहार केल्याच्या आरोप प्रकरणी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai)  हा गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Mumbai) प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये आरोपी जितेंद्र नवलानी व इतर यांनी विविध खाजगी कंपन्यांकडून, अंमलबजावणी संचलनालय (ED विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून काम करण्याच्या मोबदल्यात कोट्यावधी रुपये घेतले. आरोपीने 2015 ते 2021 या कालावधीमध्ये तब्बल 58 कोटी 96 लाख 46 हजार रुपये स्विकारले.

 

खाजगी कंपन्यांकडून घेतलेले पैसे जितेंद्र नवलानी याने त्याच्या नावावर असलेल्या आणि मालकी व नियंत्रणामधील Briefcase Company/Shell Company या कंपन्यांच्या माध्यमातून Unsecured Loans व Consultancy Fees च्या स्वरुपात घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आली आहे. मुंबई एसीबीने (Mumbai ACB) जितेंद्र नवलानी व इतरांविरोधात कलम 8 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (26 जुला 2018 पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार) व कलम 7 अ, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

कोण आहे जितेंद्र नवलानी?


जितेंद्र नवलानी हे अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीचे वसुली अधिकारी म्हणून काम करत आहे.

संजय राऊत यांच्या दाव्यानुसार त्यांना सध्या दिल्लीत पदोन्नती मिळाली आहे.

राऊत यांच्या दाव्यानुसार जितेंद्र नवलानी हे 7 कंपन्यांचे संचालक आहेत.

राऊतांच्या आरोपानुसार, या सात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या बिल्डर्सनी कोट्यावधी रुपये ट्रान्सफर केले.

नोव्हेंबर 2021 मध्ये आयकर विभागाने (Income Tax Department) नवलानी आणि त्याच्या पत्नीला बेनामी संपत्तीप्रकरणी नोटीस पाठवली होती.

बोनान्झा फॅशन मर्चंट या कंपनीत बेनामी आणि बेहिशेबी व्यवहार प्रकरणी आयटीने नोटीस पाठवली होती.

यानुसार आयक विभागाने चौकशी केल्यानंतर, उत्पन्नाचा स्त्रोत बनावट असल्याचे समोर आलं होतं.

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | mumbai acb files case against jitendra navlani before few days
shivena mp sanjay raut told about her in media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Municipal Election 2022 | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्येच !

Deepali Dhumal | पुणे शहरात सर्व ठिकाणी शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करा

Pune Crime | प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक किशोर पाटे, संकेत पाटे, रोहन पाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल